मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ

रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) खेळलेल्या चौथ्या भारतीय खेळाडूला कोरोना झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण (Irfan Pathan) याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. याआधी इरफानचा भाऊ युसूफ पठाण, सचिन तेंडुलकर आणि सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनीही आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं.

काय म्हणाला इरफान?

माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, मला कोरोनाचे कोणतीही लक्षणं नाहीत. स्वत:ला घरात क्वारंटाईन करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, असं ट्वीट इरफानने केलं आहे.

त्याआधी आजच सुब्रमण्यम बद्रीनाथ यानेही आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. 'मी सगळी काळजी घेत होतो, तसंच वेळोवेळी कोरोना टेस्टही करत होतो, पण यावेळी माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, मला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत,' असं ट्वीट बद्रीनाथने केलं.

'मी सगळे नियम पाळत असून स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेत आहे,' असं बद्रीनाथ म्हणाला. 2018 साली बद्रीनाथने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा पराभव केला होता.

रायपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना यायला परवानगी देण्यात आली होती. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता बीसीसीआयने पहिल्या दोन टी-20 नंतर भारत-इंग्लंड यांच्यातले सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला.

या सीरिजमध्ये भारताकडून सचिन, सेहवाग, युवराज, इरफान पठाण, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, एस.बद्रीनाथ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळले होते.

'कोरोना दूर ठेवण्यासाठी मी योग्य खबरदारी घेत होतो आणि चाचणी देखील करत होतो. मात्र तरीदेखील सौम्य लक्षण आढळून मी पॉझिटिव्ह आढळलो आहे. घरातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक प्रोटोकॉल्सचे पालन देखील करत आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो जे मला आणि देशातील इतरांना पाठिंबा देत आहेत. सर्वांनी काळजी घ्या,' असं ट्वीट सचिनने केलं.

'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. घरामध्येच स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. संपूर्ण खबरदारी आणि औषधं घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी लवकरात लवकर कोरोनाची टेस्ट करून घ्यावी,' असं युसूफ पठाण म्हणाला आहे.

First published:

Tags: Corona, Cricket news