मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'...त्या पराभवानंतर खचून गेलो, मन तुटलं', आठवणींनी ऋषभ पंत झाला भावुक

'...त्या पराभवानंतर खचून गेलो, मन तुटलं', आठवणींनी ऋषभ पंत झाला भावुक

टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये ऐतिहासिक 89 रनची नाबाद खेळी केली. पंतच्या या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पराभव करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर 2-1 ने कब्जा केला.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 जानेवारी : टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये ऐतिहासिक 89 रनची नाबाद खेळी केली. पंतच्या या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) पराभव करत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर 2-1 ने कब्जा केला. ब्रिस्बेन टेस्टमधल्या या धमाकेदार खेळीनंतर सगळेच जण ऋषभ पंतला सलाम करत आहेत. पण पंतला आजही 2019 वर्ल्ड कप (World Cup 2019) ची सेमी फायनल आठवत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये पंत खराब शॉट मारून आऊट झाला होता. त्या आठवणींवर ऋषभ पंतने प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ऋषभ पंत म्हणाला, '2019 वर्ल्ड कपमध्ये मला टीमला जिंकवण्याची चांगली संधी होती, पण ही संधी मी गमावली. त्यावेळी मी खचून गेलो, माझं मनही तुटलं होतं, कारण भारताला जिंकवण्याची संधी मला पुन्हा कधी मिळेल, हे माहिती नव्हतं.'

खराब शॉट खेळल्याने आऊट झाल्यानंतर अनेकवेळा पंतवर टीकेची झोडही उठली आहे. पण ब्रिस्बेनमधल्या खेळीमुळे पंतने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. 'मला नेहमीच कठीण काळात टीमला मॅच जिंकवून द्यायची होती. स्वत:साठी रन करण्याचा विचार मी कधीही केलेला नाही. 20 रनची खेळी आणि एक चांगला कॅच पकडूनही तुम्ही टीमला मॅच जिंकवून देऊ शकता,' असं ऋषभ पंतने सांगितलं.

First published:

Tags: India vs Australia, Rishabh pant