Home /News /sport /

भारतीय क्रिकेटपटूनेच दिला ऋषभ पंतला धोका, दीड कोटी रुपयांना लुटलं!

भारतीय क्रिकेटपटूनेच दिला ऋषभ पंतला धोका, दीड कोटी रुपयांना लुटलं!

टीम इंडियाचा विकेट कीपर बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला दीड कोटी रुपयांना लुटण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतला धोका दिला आहे.

    मुंबई, 23 मे : टीम इंडियाचा विकेट कीपर बॅटर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला दीड कोटी रुपयांना लुटण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतला धोका दिला आहे. मृणांक सिंग (Mrinank Singh) नावाच्या या क्रिकेटपटूला पोलिसांनी या महिन्यात दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती. पंतने त्याचा मॅनेजर पुनित सोळंकीसोबत मृणांकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दिल्लीच्या एका कोर्टाने मृणांक सिंगला हजर करण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये एक नोटीस पाठवली होती. मृणांकवर एका व्यापाऱ्याची स्वस्तात महागडं घड्याळ आणि मोबाईल देतो सांगून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली, तेव्हा हरियाणाच्या या क्रिकेटरने ऋषभ पंतलाही चुना लावल्याचं समोर आलं. पंतने त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाऊन्स चेकच्या माध्यमातून पंतची 1 कोटी 63 लाख रुपयांची फसवणूक झाली, असा दावा पंतच्या मॅनेजरने केला आहे. साकेत कोर्टाने मागच्या आठवड्यात मुंबईच्या आर्थर रोड जेलला नोटीस पाठवली, यात मृणांक सिंगला हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. एका व्यापाऱ्याची 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मृणांकला या महिन्याच्या सुरूवातीला मुंबईच्या जुहू पोलिसांनी अटक केली होती. ऋषभ पंतला फ्रॅन्क मुलर वॅनगार्ड याचिंग सीरिजचं घड्याळ विकत घ्यायचं होतं, यासाठी त्याने 36,25,120 रुपये दिले. याशिवाय रिचर्ड मिलच्या एका घड्याळासाठी त्याने 62,60,000 रुपये आणखी दिले होते. मृणांकने ऋषभ पंत आणि त्याच्या मॅनेजर सोळंकीला आपण लक्झरी घड्याळ स्वस्तात विकत घेऊ शकतो असं सांगितलं. मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार मृणांक सिंगने आपली फसवणूक केल्याचं आणि खोटं आश्वासन दिल्याचं ऋषभ पंतने त्याच्या तक्रारीमध्ये म्हणलं आहे. तक्रारीमध्ये घड्याळाच्या किंमतीबाबतही माहिती देण्यात आली आहे. 'आपण लक्झरी घड्याळं, बॅग आणि महागड्या वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे, असं मृणांकने ऋषभ पंत आणि त्याच्या मॅनेजरला सांगितलं. तसंच त्याने अनेक क्रिकेटपटूंनी आपल्याकडून घड्याळ विकत घेतल्याचा दावाही मृणांकने केला. तसंच तुझ्यासाठी मोठा डिस्काऊंट देऊन स्वस्तात घड्याळ विकत घेऊ शकतो, असे खोटे दावे मृणांकने केल्याचं पंतने तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. मृणांकच्या या दाव्यांवर विश्वास ठेवून पंतने फेब्रुवारी 2021 मध्ये त्याला लक्झरी घड्याळ आणि काही महागडे दागिने दिले, ज्याला पंतने 65,70,731 रुपयांना विकत घेतलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rishabh pant

    पुढील बातम्या