मुंबई, 7 जानेवारी : यंदा पाकिस्तानमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आशिया कप 2023 वरून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डांमध्ये वाद सुरु आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मागील वर्षी जर आशिया कपचे आयोजन पाकिस्तानात होणार असेल तर भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तर पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डानेही यावर प्रतिक्रिया देत जर पाकिस्तानमध्ये आशिया कप होऊ दिला नाही तर भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात पाकचा क्रिकेटसंघ सहभागी होणार नाही असे सांगितले. या वादावर आता भारताचा क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने सोल्युशन दिले आहे. शनिवारी अशियन क्रिकेट काउंसिल यांची बहरीनमध्ये आशिया कप वरून सुरु असलेल्या भारत पाकिस्तान वादावर बैठक पारपडली. याबैठकीला जय शहा यांच्या समवेत पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डातील सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही देशांनी आपल्या भूमिका शियन क्रिकेट काउन्सिल समोर मांडल्या. याबैठकीनंतर यंदाचा आशिया कप पाकिस्तान ऐवजी दुबईत आयोजित केली जाणार अशी शक्यता आहे. परंतु यावर अंतिम निर्णय मार्च महिन्यात घेतला जाईल. IND VS AUS : टीम इंडियाच्या प्लेयिंग 11 मधून सूर्यकुमार, अक्षर पटेल बाहेर! आशिया कप वरून भारत पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या वादावर भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने आपले मत व्यक्त केले आहे. अश्विन म्हणाला, भारत पाकिस्तान यांच्यात क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावरून होणार हा वाद काही नवीन नाही. जेव्हा भारत म्हणतो की आम्ही त्यांच्या देशात क्रिकेट सामने खेळणार नाही तेव्हा ते ही म्हणतात की आम्ही देखील तुमच्या देशात येणार नाही.
युट्युब चॅनेलवर एका मुलाखतीत रविचंद्रन अश्विनने म्हंटले, भारत पाक यांच्यात वाद सुरु असल्याने यंदाचा आशिया कप हा श्रीलंकेत खेळाला जावा असे मला वाटते. दुबई मध्ये क्रिकेटचे अनेक सामने खेळवले जाणार आहेत. तेव्हा दुबई ऐवजी श्रीलंकेत हा सामना खेळवला गेला तर मला अधिक आनंद होईल असे अश्विनने म्हंटले. तेव्हा आता अशियन क्रिकेट काउन्सिल अश्विनच्या या सजेशनचा विचार करते का हे पाहणं महत्वाचं ठरेल.