जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : आर अश्विन करत होता मांकडिंगचा प्रयत्न, पंचांनी मधेच अडवलं आणि....

VIDEO : आर अश्विन करत होता मांकडिंगचा प्रयत्न, पंचांनी मधेच अडवलं आणि....

VIDEO : आर अश्विन करत होता मांकडिंगचा प्रयत्न, पंचांनी मधेच अडवलं आणि....

अश्विन रनअपनंतर थांबला. अश्विन राशिदला बाद करण्याच्या तयारीत असतानाच पंचांनी त्याला रोखलं याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 एप्रिल : सनरायजर्स हैदराबादच्या संघाला रविवारी त्यांच्या घरच्या मैदानावर राजस्थानकडून पराभूत व्हावं लागलं. तब्बल ७२ धावांनी राजस्थानने त्यांना हरवलं. या सामन्यात हैदराबादच्या संघाची धुरा तात्पुरती भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. त्यांचा नियमित कर्णधार एडन मार्करम राष्ट्रीय संघाच्या सामन्यामुळे आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. राजस्थानचा फिरकीपटू अश्विन पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीवेळी केलेल्या कृतीने चर्चेत आला आहे. आर अश्विन गेल्या हंगामात त्याच्या मांकडिंग धावबादच्या प्रयत्नामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा त्याच्या अशाच प्रयत्नाची चर्चा होत आहे. रविचंद्रन अश्विनच्या मांकडिंगच्या प्रयत्नाची दखल थेट पंचांनीच घेतली. आयपीएलमध्ये अश्विन सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अब्दुल समदला गोलंदाजी करत होता. तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडला इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर आदिल राशिद उपस्थित होता. अश्विन रनअपनंतर थांबला. अश्विन राशिदला बाद करण्याच्या तयारीत असतानाच पंचांनी त्याला रोखलं. SRHच्या पराभवाने चाहते नाराज, स्टेडियममध्ये काव्या मारनला केलं ट्रोल; फोटो व्हायरल अश्विनला पंचांनी का रोखलं हे अद्याप समोर आलं नाही. पण युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात असं दिसतं की, अश्विन जेव्हा धावबाद करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आदिल राशिद क्रीजमध्येच होता. जर त्याने चेंडू स्टम्पला लावला असता तरी राशिद आऊट झाला नसता.

रविचंद्रन अश्विन पंजाबकडून खेळत होता तेव्हा त्याने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला मांकडिंग पद्धतीने बाद केलं होतं. यानतंर मांकडिंग नियमावरून वाद सुरू झाला होता. क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी ही खिलाडूवृत्ती नसल्याचं म्हटलं होतं. मात्र अश्विनने आयसीसीच्या नियमांचा दाखला देत हे चुकीचं नसल्याचं म्हटलंय. तसंच भविष्यात अशी संधी असेल तर फलंदाजाला बाद करेन असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात