जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यात द्रविड गुरुजींच्या ब्रेकवर 'या' दिग्गज खेळाडूची टीका, म्हणाले, 'कोचने नेहमी...

Ind vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यात द्रविड गुरुजींच्या ब्रेकवर 'या' दिग्गज खेळाडूची टीका, म्हणाले, 'कोचने नेहमी...

राहुल द्रविड

राहुल द्रविड

Ind vs NZ: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती दिली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही ब्रेक घेतला आहे. द्रविड यांच्या या निर्णयावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीका केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 17 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड-कप स्पर्धेत सेमी-फायनल मॅचमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय टीम न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी विश्रांती दिली आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही ब्रेक घेतला असल्याने ते न्यूझीलंड दौर्‍यात नसतील. द्रविड यांच्या या निर्णयावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीका केली आहे. शास्त्रींची द्रविडवर टीका टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी-20 मॅचेस खेळणार आहे. या दौर्‍यात हार्दिक पंड्या टी-20 टीमचं, तर शिखर धवन वन-डे टीमचं नेतृत्व करणार आहे. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण हे प्रशिक्षक म्हणून टीमसोबत असतील. द्रविड यांच्या अनुपस्थितीवर रवी शास्त्री यांनी टीका केली आहे. तसंच न्यूझीलंड दौर्‍यात टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीचीही अपेक्षाही केली आहे.  राहुल द्रविड यांनी 2021च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच म्हणून रवी शास्त्री यांच्याकडून सूत्रं स्वीकारली. द्रविड यांच्या कार्यकाळात टीमची कामगिरी खूप उत्तम असल्याचं काही दिसलेलं नाही. या काळात टीम इंडियाने द्विपक्षीय सिरीज जिंकली. परंतु, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी फारशी उंचावलेली नाही. तसंच या वर्षीचा आशिया कप आणि आताच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. राहुल द्रविड यांच्या विश्रांतीविषयी रवी शास्त्रींनी आपली परखड मतं मांडली आहेत. ते म्हणाले, ‘कोचने नेहमीच परिस्थितीनुरूप आणि प्रोफेशनली वागायला हवं. त्यांनी आपल्या टीममधल्या खेळाडूंसोबत वेळ घालवायला हवा. सतत विश्रांती किंवा ब्रेक घेणं अयोग्य आहे.’ हेही वाचा -  FIFA WC 2022: बापरे! माराडोनाचा ‘हात’ लागलेल्या ‘त्या’ फुटबॉलला ‘सोन्याचा’ भाव, वर्ल्ड कप आधी झाला लिलाव आयर्लंड, झिम्बाब्वे दौऱ्यातही घेतला होता ब्रेक द्रविड यांनी विश्रांती घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी आयर्लंड आणि झिंबाब्वे दौर्‍यावेळी ब्रेक घेतला होता. दोन्ही वेळा व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. शास्त्री म्हणाले, ‘ब्रेक या गोष्टीवर माझा विश्वास नाही. उलट, कोच म्हणून मला माझी टीम आणि खेळाडूंना जाणून घ्यायला आवडेल. त्यानंतर मग टीमवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल याचा मी विचार करेन. अगदी प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर, इतक्या विश्रांतीची काय गरज आहे? आयपीएल सुरू असताना दोन-तीन महिने विश्रांती मिळतेच. एका कोचसाठी एवढी विश्रांती पुरेशी आहे. कोच कुणीही असलं, तरी त्यांनी प्रोफेशनली वागायला हवं असं मला वाटतं. ‘सलग दोन मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या खालावलेल्या कामगिरीमुळे चाहते नाराज आहेत. परंतु, सध्याचा टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा आशादायी ठरेल, अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे. हेही वाचा -  Ind vs NZ: ‘ती’ जात होती पंड्याकडे, ‘तिला’ पकडलं विल्यम्सननं… पहिल्या टी20 आधी हे काय घडलं? Video कसं असेल टीम इंडियाचं भविष्य शास्त्री म्हणाले, ‘मी आता कुठलंच भाकित करू इच्छित नाही. परंतु, भविष्याच्या दृष्टीने टीम इंडियातल्या प्रत्येक खेळाडूच्या रोलबाबत काही निश्चित ठरवायला हवं. तसंच कोणते खेळाडू मॅचविनर आहेत हेही पाहायला हवं. इतकंच नाही, तर इंग्लंड टीमने संघबांधणीसाठी ज्या बाबींचा विचार केला आहे, त्यानुसार टीम इंडियानेही विचार करायला हवा. इंग्लंडची टीम सध्या उत्तम कामगिरी करत आहे. तसंच त्यांचं मॅचवरचं नियंत्रणही स्तुत्य आहे. 2015च्या विश्वचषकानंतर इंग्लिश क्रिकेटवर खूप टीका झाली. त्यानंतर विचारांती त्यांनी आपली भूमिका बदलली आणि लिमिटेड ओव्हर्सच्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम खेळाडूंनाच खेळवण्याचा निर्णय घेतला.’

    जाहिरात

    रवी शास्त्री असं म्हणाले, ‘इंग्लंडने सीनिअर्सना संघात स्थान दिलं नाही. त्यांनी अशा युवा पिढीची निवड केली, जे निडर आणि कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे असतील. ही एक प्रकारची भूमिका त्यांनी घेतली, ज्यांचा अवलंब करणं आपल्यालाही शक्य आहे. भारतात गुणवत्तेची कमतरता नाही. भविष्याची सुरुवात या न्यूझीलंड दौर्‍यापासून होऊ शकते. सध्याची टीम पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की, ही ताज्या दमाची आणि युवा टीम आहे. या दौर्‍यात त्याची पारख होईलच आणि त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे तयारही करू शकाल. येत्या दोन वर्षांत या टीमला तुम्ही नक्कीच आहे त्यापेक्षा पुढे घेऊन जाऊ शकाल.’

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात