मुंबई, 27 डिसेंबर : रणजी ट्रॉफीत मंगळवापरासून तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. डेहराडूनच्या अभिमन्यू क्रिकेट अकादमीत एलीट ग्रुप एमध्ये असलेल्या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या संघांमध्ये सामना खेळला जात आहे. हिमाचल प्रदेशचा कर्णधार ऋषी धवनने नाणेफेक जिंकून प्रथcriम फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर मध्यमगती गोलंदाज दीपक धपोलाने हिमाचलच्या फलंदाजांना घाम फोडला. हिमाचल प्रदेशचा एकही फलंदाज मैदानावर फार काळ टिकाव धरू शकला नाही. संपूर्ण संघ 49 धावातच तंबूत परतला. धपोलाने त्याच्या शेवटच्या 5 चेंडूत 4 गडी बाद केले. तर डावात 8 विकेट घेतल्या. उत्तराखंडच्या गोलंदाजांनी हिमाचलच्या अर्ध्या संघाला 35 धावा तंबूत धाडले होते. यातील चार गडी दीपक धपोलाने बाद केले होते. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर हिमाचलचे खालच्या फळीतील फलंदाज जास्त वेळ टिकाव धरू शकले नाही. धपोलाने त्याच्या शेवटच्या 5 चेंडूत 4 विकेट घेतल्या आणि हिमाचलचा डाव 49 धावांवर संपुष्टात आला. हेही वाचा : मुंबईच्या संघात खान ब्रदर्स, सरफराजच्या लहान भावाचे रणजी पदार्पण धपोलाने 14 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कलसीला आणि अखेरच्या चेंडूवर डागरला बाद केलं. त्यानंतर पुढच्या षटकाच्या सुरुवातीच्या तीन चेंडूत त्याने 2 फलंदाजांना बाद केलं. सामन्यात त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या. हिमाचलचे 5 फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. संपूर्ण संघ फक्त 16.3 षटकेच खेळू शकला. हिमाचलकडून सर्वाधिक 26 धावा अंकित कलसीने केल्या. तर उत्तराखंडच्या अभय नेगीने 2 गडी बाद केले. दीपक धपोलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बिहारविरुद्ध पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 गडी असे मिळून 9 विकेट घेतल्या होत्या. दीपकने आतापर्यंत 14 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत. यात 5 वेळा 5 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत तर 2 वेळा 10 किंवा त्याहून जास्त विकेट घेण्याचा विक्रमही आहे. हेही वाचा : VIDEO : रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कोट्यवधींची आलिशान कार, सरप्राइज पाहताच झाला अवाक् दीपक धपोलाचे भारताचा माजी कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीशी खास कनेक्शन आहे. विराट कोहलीचे प्रशिक्षक असणाऱ्या राजकुमार शर्मा यांच्याकडून दीपक धपोला क्रिकेटचे धडे गिरवतो. क्रिकेट अकादमीत याआधी दीपकने विराट कोहलीला नेटमध्येही गोलंदाजी केली आहे. विराट कोहलीने दीपक धपोलाच्या गोलंदाजीचं कौतुकही केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.