जयपूरला झालेल्या सामन्यात अजिंक्य राहनेच्या राजस्थान रॉयल संघाला प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा चाहता प्रेक्षकांच्या बघण्यात आला, त्याचे वैशिष्ट म्हणजे त्याची लांबलचक आसणारी मिशी जी 14 फूट लांब आहे. कदाचीत तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. 14 फूट लांब मिशी असणाऱ्या या चाहत्याचे नाव आहे . वर्ष 2010 मध्ये त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.
राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागात राम सिंह चौहान काम करतात. रविवारी ते राजेशाही पोषाख घालून आपल्या 14 फूट लांबीच्या मिशांना त्यांनी लाल रंगाच्या कपड्यात गुडांळले होते. असा पेहराव घालून त्यांनी राजस्थान संघाला प्रोत्साहीत केलं आहे. राम सिंह 30 वर्षांपासून त्यांच्या मिशाना वाढवत आहेत, मिशा वाढवण्याचे प्रोत्साहन त्यानां राजस्थानच्याच कर्णभील नावाच्या व्यक्ती कडून मिळाले आहे.
रोज राम सिंहाना मिशाची तयारी करण्यासाठी कमीत-कमी 1 तास लागतो. आणि ते रोज मिशांची तेलाने मालिश करतात. आणि त्यानां कपड्याने गुडांळून घेतात.
राम सिंह त्यांच्या मिशांना दर 10 दिवसांनी धुतात या कामात त्यानां त्यांची पत्नी मदत करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







