मुंबई, 13 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा अखेरचा सामना पारपडला. चौथा सामना ड्रॉ झाल्यामुळे भारताने या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवत विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियावर सलग चौथ्यांदा विजय साजरा केला. परंतु शेवटच्या सामन्यादरम्यान चेतेश्वर पुजाराला दिलेल्या बॉलिंगवरून भारताचा गोलंदाज आर अश्विनने मजेदार ट्विट केले.
न्यूझीलंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात मात दिल्यामुळे भारतीय संघ थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीमुळे रटाळवाणा होत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांना गोलंदाजी करण्याची संधी दिली.
Main kya karu? Job chod du? 😂 pic.twitter.com/R0mJqnALJ6
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 13, 2023
चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांना गोलंदाजी करताना पाहून रविचंद्रन अश्विनने मजेदार प्रतिक्रिया दिली. डिलिव्हरी स्ट्राईडमधील पुजाराच्या फोटो ताईने ट्विट करून त्याला, "मै क्या करू? जॉब छोड दू?" असे कॅप्शन दिले. अश्विनच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चांगलाच हशा पिकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia, R Ashwin, Test cricket