Home /News /sport /

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या घरी येणार 'गूड न्यूज', पत्नीसोबत शेयर केला PHOTO

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या घरी येणार 'गूड न्यूज', पत्नीसोबत शेयर केला PHOTO

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या (Quinton De Kock) घरी आनंदाची बातमी येणार आहे. क्विंटन डिकॉकची पत्नी साशा डिकॉक पुढच्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

  मुंबई, 11 जुलै : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महत्त्वाचा खेळाडू असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकच्या (Quinton De Kock) घरी आनंदाची बातमी येणार आहे. क्विंटन डिकॉकची पत्नी साशा डिकॉक पुढच्या वर्षी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. क्विंटन डिकॉकने सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून चाहत्यांना ही बातमी दिली. त्याने बेबी डिकॉक सोबत, असं कॅप्शनही या फोटोला दिलं. क्विंटन आणि साशा यांनी एकमेकांना जवळपास 4 वर्ष डेट केल्यानंतर 2016 साली मॉरेशियसमध्ये लग्न केलं. डिकॉकने ही आनंदाची बातमी शेयर करताच मुंबई इंडियन्समधला त्याचा सहकारी सूर्यकुमार यादव, दक्षिण आफ्रिकेचा वेन पार्नेल आणि मॉर्ने मॉर्कल यांच्यासह काही क्रिकेटपटूंनी अभिनंदन केलं. 28 वर्षांच्या क्विंटनने शेयर केलेल्या फोटोमध्ये साशाही त्याच्यासोबत आहे. तसंच एका मुलाची जर्सी हूकमध्ये अडकवलेली दिसत आहे. बेबी डिकॉक जानेवारी 2022 साली येणार आहे, असंही त्याने सांगितलं.
  View this post on Instagram

  A post shared by Quinton De Kock (@qdk_12)

  डिकॉक आता दक्षिण आफ्रिकेकडून आयर्लंडविरुद्ध (South Africa vs Ireland) 3 वनडे आणि 3 टी-20 सीरिज खेळणार आहे. 11 जुलैपासून डबलिनमध्ये या सीरिजला सुरुवात होणार आहे. मुंबईला 2020 सालची आयपीएल (IPL) जिंकवण्यात क्विंटन डिकॉकने मोलाची भूमिका बजावली. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आता आयपीएलचे उरलेले सामने युएईमध्ये होणार आहेत, तेव्हाही डिकॉकचा फॉर्म मुंबईसाठी महत्त्वाचा असणार आहे.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Cricket, Quinton de kock

  पुढील बातम्या