• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • फूलराणी 'मस्तानी'सोबत बॅडमिंटन कोर्टवर, सिंधू-दीपिकाने गाळला घाम, PHOTO आणि VIDEO VIRAL

फूलराणी 'मस्तानी'सोबत बॅडमिंटन कोर्टवर, सिंधू-दीपिकाने गाळला घाम, PHOTO आणि VIDEO VIRAL

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या दोघींनी बॅडमिंटन खेळलं.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) या दोघींनी बॅडमिंटन खेळलं. बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ आणि फोटो दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. आयुष्यातला नेहमीचा दिवस, पीव्ही सिंधूसोबत कॅलरी बर्न केल्या, असं कॅप्शन दीपिकाने या पोस्टला दिलं आहे. पीव्ही सिंधूने नुकत्याच झालेल्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये धमाकेदार कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिंधूला ब्रॉन्झ मेडल मिळालं. दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू आहे. 2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये तिला सिल्व्हर मेडल मिळालं होतं.
  काहीच दिवसांपूर्वी पीव्ही सिंधू दीपिका आणि रणवीर सिंग एकत्र दिसले होते. तेव्हादेखील या तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मैत्रीण PV सिंधूसोबत दिसली दीपिका; सिंगल फोटो देण्यास दिला नकार दीपिका पदुकोण बॉलिवूडमध्ये असली तरी तिलादेखील बॅडमिंटनचा वारसा आहे. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण भारताचे नावाजलेले बॅडमिंटनपटू होते. 1980 साली प्रकाश पदुकोण बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. तसंच त्यांनी त्याच वर्षी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीपचा किताब जिंकला होता. ही स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय होते. भारत सरकारकडून त्यांना 1972 साली अर्जुन पुरस्कार आणि 1982 साली पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
  Published by:Shreyas
  First published: