मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तोंडावर बॉल आपटल्यामुळे क्रिकेटपटू गंभीर जखमी, शस्त्रक्रियेनंतर घातले 7 टाके

तोंडावर बॉल आपटल्यामुळे क्रिकेटपटू गंभीर जखमी, शस्त्रक्रियेनंतर घातले 7 टाके

दुखापत आणि बॉल लागणं क्रिकेटपटूंना काही नवीन नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) लाहोर कलंदर्सकडून (Lahore Qalandars) खेळणाऱ्या विकेट कीपर बॅट्समन बेन डंक यालाही दुखापत झाली आहे. अबु धाबीमध्ये सराव करत असताना बेन डंकच्या (Ben Dunk) तोंडाला बॉल लागला.

पुढे वाचा ...

मुंबई, 7 जून : दुखापत आणि बॉल लागणं क्रिकेटपटूंना काही नवीन नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) लाहोर कलंदर्सकडून (Lahore Qalandars) खेळणाऱ्या विकेट कीपर बॅट्समन बेन डंक यालाही दुखापत झाली आहे. अबु धाबीमध्ये सराव करत असताना बेन डंकच्या (Ben Dunk) तोंडाला बॉल लागला. डंकला झालेली ही दुखापत एवढी गंभीर होती की त्याला 7 टाके घालावे लागले. डावखुरा बेन डंक हा लाहोरसाठी अत्यंत महत्त्वाचा बॅट्समन आहे, त्यामुळे मोक्याच्या क्षणी त्याला झालेली ही दुखापत लाहोरसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

कॅचचा सराव करत असताना 34 वर्षांच्या बेन डंकच्या तोंडावर बॉल आदळला. यानंतर त्याला 7 टाके घालण्यात आले, तसंच त्याच्या ओठांवरही शस्त्रक्रिया करावी लागली. बेन डंक याची दुखापत बरी होत आहे, तसंच तो 9 जूनला इस्लामाबादविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होईल, अशी आशा लाहोर टीमने व्यक्त केली आहे. लाहोर कलंदर्स सध्या पीएसएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकार आहे.

कोरोनामुळे पीएसएल स्थगित होण्याआधी बेन डंक चांगल्या फॉर्ममध्ये होता. 4 सामन्यांमध्ये त्याने 40 च्या सरासरीने 80 रन केले, यामध्ये कराचीविरुद्धच्या नाबाद 57 रनचाही समावेश होता. सोहेल अख्तरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लाहोरच्या टीममध्ये शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi), मोहम्मद हफीज (Mohammad Hafeez) आणि हॅरिस राऊफ (Harris Rauf) हे पाकिस्तानी खेळाडू तर राशिद खान (Rashid Khan), डेव्हिड वाईस (David Wiese) आणि समित पटेल (Samit Patel) हे परदेशी खेळाडू आहेत. पीएसएलच्या पाच मोसमांमध्ये लाहोरला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे पीएसएल रद्द करण्यात आली होती, यानंतर आता युएईमध्ये पीएसएलचे उरलेले सामने होणार आहेत.

First published:

Tags: Cricket, Pakistan