मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PKL : मुंबई इंडियन्ससारखी आहे या टीमची पोजिशन, रोहितसारखी ठरणार का बाजीगर?

PKL : मुंबई इंडियन्ससारखी आहे या टीमची पोजिशन, रोहितसारखी ठरणार का बाजीगर?

प्रो कबड्डी लीगच्या (PKL) पहिल्या राऊंडचा आता अखेरचा आठवडा सुरू झाला आहे, त्यामुळे नॉक आऊटमध्ये कोण जाणार यासाठीचा रोमांच आणखी वाढला आहे.

बँगलोर, 7 फेब्रुवारी : प्रो कबड्डी लीगच्या (PKL) पहिल्या राऊंडचा आता अखेरचा आठवडा सुरू झाला आहे, त्यामुळे नॉक आऊटमध्ये कोण जाणार यासाठीचा रोमांच आणखी वाढला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पटणाची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. पटणा पायरट्सचा 16 पैकी 11 मॅचमध्ये विजय झालाय, तर 4 मॅच त्यांनी गमावल्या आणि 1 मॅच टाय झाली. पटणाच्या या कामगिरीमुळे ते टॉप-6 मध्ये राहतील हे निश्चित मानलं जातंय.

प्रो कबड्डी लीगच्या नॉक आऊटमध्ये पॉईंट्स टेबलमधल्या टॉप 6 टीम जातात. टॉप-6 मधल्या खालच्या 4 टीम एलिमिनेटरमध्ये खेळतात. एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणाऱ्या टीम सेमी फायनलमध्ये पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-2 टीमविरुद्ध सेमी फायनलमध्ये खेळतात. सेमी फायनलमधल्या विजयी टीममध्ये फायनल खेळवली जाते.

प्रो कबड्डी लीगच्या या मोसमात गुजरात जायंट्सच्या (Gujrat Giants) टीमची अवस्था आयपीएलच्या (IPL) मुंबई इंडियन्ससारखी (Mumbai Indians) झाली आहे. गुजरातने 17 पैकी 6 मॅच जिंकल्या, तर 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि 3 मॅच टाय झाल्या. मागच्या 5 पैकी गुजरातने 3 मॅच जिंकल्या आणि 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि टॉप-6 मध्ये येण्यासाठी गुजरातला आता उरलेल्या सगळ्या सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे.

First published:

Tags: Pro kabaddi league