मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

प्रॅक्टिस बंद करण्याच्या पॉण्टिंगच्या वक्तव्यावर पृथ्वी शॉने दिलं प्रत्युत्तर, म्हणाला...

प्रॅक्टिस बंद करण्याच्या पॉण्टिंगच्या वक्तव्यावर पृथ्वी शॉने दिलं प्रत्युत्तर, म्हणाला...

आक्रमक युवा खेळाडू पृथ्वी शॉमध्ये (Prithvi Shaw) कोणत्याही बॉलरला त्रास द्यायची क्षमता आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्येही (IPL 2021) पृथ्वी शॉने धमाकेदार कामगिरी केली. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Captials) मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने एका मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉबाबत धक्कादायक खुलासा केला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 24 मे : आक्रमक युवा खेळाडू पृथ्वी शॉमध्ये (Prithvi Shaw) कोणत्याही बॉलरला त्रास द्यायची क्षमता आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्येही (IPL 2021) पृथ्वी शॉने धमाकेदार कामगिरी केली, पण कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल स्थगित होईपर्यंत शॉने 38.50 च्या सरासरीने आणि 166.49 च्या स्ट्राईक रेटने 308 रन केले. मागच्या मोसमामध्ये मात्र शॉची कामगिरी निराशाजनक झाली. 2020 च्या आयपीएलमध्ये (IPL 2020) त्याने 17.54 च्या सरासरीने 228 रन केले. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Captials) मुख्य प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) याने एका मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉबाबत धक्कादायक खुलासा केला होता. शॉ जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हा त्याला नेटमध्ये सरावही करायचा नव्हता. पृथ्वी शॉला मी नेटमध्ये सराव करण्यासाठी आग्रह केला, पण त्याने मला नकार दिला, असं रिकी पॉण्टिंग म्हणाला होता. रिकी पॉण्टिंगच्या या खुलाशावर आता पृथ्वी शॉने प्रत्युत्तर दिलं आहे. तो क्रिकबझशी बोलत होता. 'अशीही वेळ आली, जेव्हा माझ्या रन होत नव्हत्या. मी मेहनत करत होतो, पण त्याचे चांगले परिणाम दिसून येत नव्हते, त्यामुळे मी हैराण झालो होतो. वारंवार प्रशिक्षण घेण्यात मला काहीच अर्थ वाटत नव्हता. मागच्या वर्षी मी जास्त रन करत नव्हतो. मला बॅटिंग करायची होती, पण रनच मिळत नव्हत्या. मी प्रशिक्षण सुरू ठेवलं, पण तरीही मनासारखे परिणाम येत नव्हते, त्यामुळे एक वेळ अशी आली जेव्हा मी वैतागलो. जर परिणामच मिळत नसतील, तर मी सरावही बंद करतो, असं सांगितलं,' असं शॉ म्हणाला. पृथ्वी शॉची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीममध्ये निवड झालेली नाही. त्याने भारताकडून 5 टेस्ट आणि 3 वनडे खेळल्या आहेत. शॉने टेस्टमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 339 रन केले, तर वनडेमध्ये त्याला फक्त 84 रनच करता आले. भारतीय टीम इंग्लंडमध्ये असताना आणखी एक टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी शॉची निवड होऊ शकते. श्रीलंकेमध्ये टीम इंडिया वनडे आणि टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे.
First published:

Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Prithvi Shaw

पुढील बातम्या