जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबईच्या प्रभात कोळीने पूर्ण केलं ओशन सेव्हन चॅलेंज, ठरला जगातला सर्वात कमी वयाचा स्विमर

मुंबईच्या प्रभात कोळीने पूर्ण केलं ओशन सेव्हन चॅलेंज, ठरला जगातला सर्वात कमी वयाचा स्विमर

prabhat koli

prabhat koli

हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जलतरणपटूंनी आतापर्यंत ओशन्स सेवन चॅलेंज पूर्ण केलं आहे. प्रभात हे चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 मार्च : देशातल्या यशस्वी जलतरणपट्टूपैकी एक असलेल्या २३ वर्षांच्या प्रभात कोळीने दुर्मीळ असा पराक्रम केला आहे. Oceans Seven Challenge पूर्ण करण्याची कामगिरी त्याने केली. तसंच अशी कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरलाय. खराब हवामान असतानासुद्धा त्याने बुधवारी न्यूझीलंडमध्ये कूक स्ट्रेटमध्ये पोहत ८ तास ४१ मिनिटात २८ किमी अंतर पार केलं. ओशन्स सेवनला एक निर्णायक असे ओपन वॉटर स्विमिंग चॅलेंज म्हणून ओळखलं जातं. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जलतरणपटूंनी आतापर्यंत ओशन्स सेवन चॅलेंज पूर्ण केलं आहे. प्रभात हे चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीला वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशन आणि मॅरेथॉन स्विमर्स फेडरेशनचीही मान्यता आहे. बॅटला स्पॉन्सर मिळाला नाही, MSD 07 कोरलं अन् संघासाठी बनली संकटमोचक; Photo Viral प्रभात कोळीने सांगितलं की, ओशन्स सेवनचं अखेरचं आव्हान पूर्ण करताना माझ्या १५ वर्षांच्या जलतरणाच्या कारकिर्दीतला हा सर्वात सुंदर असा क्षण होता. हे माझं स्वप्न होतं. जगभरातील प्रोफेशनल जलतरणपटूंमध्ये असा विक्रम केल्यानंतर मी आनंदी आहे. मला शब्दात याचा आनंद व्यक्त करता येणार नाही. प्रभातचे वडील राजू यांनी सांगितलं की, चॅलेंजमधील अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी काही वर्षांची योजना आणि प्रयत्नांची गरज असते. अनेक महिन्यांच्या तयारीनंतर अंतिम टप्प्यात प्रयत्न केला. आता आम्हाला खूप छान वाटतंय. वेगवान वारे आणि उसळणाऱ्या लाटांसोबतच बदलतं वातावरण यामुळे अखेरच्या टप्प्यात पोहणं कठीण होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात