ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडू कुटुंबाला घेऊन जाणार? गांगुलीचे मोठे वक्तव्य

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडू कुटुंबाला घेऊन जाणार? गांगुलीचे मोठे वक्तव्य

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी नवीन माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी नुकतीच बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंपैकी अनेक खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे त्यांचे काही कुटुंबीय देखील आयपीएल पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कुटुंबियांना नेता येणार नसल्याची माहिती समोर येत होती. पण आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी नवीन माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड कुटुंबांसाठी करत आहे व्यवस्था

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याविषयी बोलताना म्हटले की, खेळाडूंच्या कुटुंबाला त्यांच्याबरोबर जाऊ न देण्याचे एकही कारण नाही. मागील 80 दिवसांपासून सर्व खेळाडू आणि कुटुंबीय बायोबबलमध्ये (खेळाडूंना व्यवस्थित खेळता यावं व ते सुरक्षित रहावेत यासाठी करण्यात आलेली व्यवस्था) राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापासून रोखण्याचे एकही कारण नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डदेखील कुटुंबियांच्या राहण्याची व्यवस्था करत असल्याची माहिती गांगुलीने दिली.

या आयपीएल स्पर्धेत अनेक खेळाडू आपली पत्नी आणि मुलांसह आले आहेत. यामध्ये विराट कोहली, उमेश यादव यांच्या पत्नींबरोबरच भारतीय संघातील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंच्या गर्लफ्रेंडदेखील ही स्पर्धा पाहण्यासाठी यूएईमध्ये गेल्या आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील पत्नी आणि कुटुंबियांना घेऊन जाऊ देण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे.

कोहलीच्या प्रश्नावर गांगुलीचे उत्तर नाही

सर्व खेळाडूंप्रमाणेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील आपली पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याबरोबर यूएईमध्ये आहे. गांगुलीला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याआधी बीसीसीआय खेळाडूंना पत्नीला दौऱ्यावेळी बरोबर घेऊन येण्याची परवानगी देत होती. परंतु काही कारणास्तव बीसीसीआयने यावर नंतर बंदी घातली होती. त्यानंतर खेळाडूंच्या आग्रही मागणीनंतर बीसीसीआयला पुन्हा ही परवानगी द्यावी लागली होती. त्यामुळे या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील कुटुंबियांना येऊ देण्याची मागणी खेळाडूंकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता गांगुलीच्या या विधानानंतर आता बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्व खेळाडूंचे लक्ष लागून आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 28, 2020, 12:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading