वेगाचा बादशाह जेव्हा कोसळला

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2017 04:59 PM IST

वेगाचा बादशाह जेव्हा कोसळला

अॅथेलेटिक्सच्या इतिहासातला असून एक अध्याय आता समाप्त झाला आहे. यानंतर कधीही उसेन बोल्ट कधीही प्रोफेशनल ट्रॅकवर धावताना दिसणार नाही. पण बोल्टचा शेवट तितका चांगला झाला नाही जितकी त्याच्या फॅन्सला अपेक्षा होती. आपली शेवटची रेस बॉल्ट पूर्णही करू शकला नाही आणि जमैकाच्या टीमला पराभवचा सामना करावा लागला.आयुष्यात कायम जिंकणारा उसेन बोल्ट शेवटची रेस मात्र हरला. आठदा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवणाऱ्या बोल्टचा खेळातला शेवट मात्र एखाद्या रनिंग ट्रेकच्या बादशहासारखा नव्हता. बोल्टसाठी शेवटची रेस एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती.

.रेसमध्ये धावता धावता त्याच्या डाव्या पायाचा स्नायू दु:खावला आणि तो पडला.तो पडल्यानंतर सारं सभागृह सुन्न झाले. जसं काही बोल्ट नाही तर तिथला प्रत्येक माणूसच हरला होता

बोल्टसोबत त्याच्या टीममध्ये ओमार मॅक्लॉड, जुलियन फोर्ट आणि योहान ब्लॅक होते. बोल्टला आपल्या या आधीच्या रेसमध्ये याच स्पर्धेत 100 मिटरच्या रेसमध्ये जस्टिस गेटलिनने हरवलं होतं.

या रेसमध्ये सुवर्ण पदक इंग्लंडला ,रौप्य पदक अमेरिकाला तर कांस्य पदक जपानला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2017 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...