कोरोना संकटात पठाण बंधूंच्या वडिलांनी मन जिंकलं, बडोद्यात करतायत 'पवित्र' काम

कोरोना संकटात पठाण बंधूंच्या वडिलांनी मन जिंकलं, बडोद्यात करतायत 'पवित्र' काम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. बहुतेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांचे वडील मेहमूद खान (Mehmood Khan) धावले आहेत.

  • Share this:

बडोदा, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संकटामुळे देशात 13 महिन्यांपूर्वी कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. आता 13 महिन्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. मागच्यावर्षापेक्षा यावेळी रुग्णवाढीचं प्रमाण कमालीचं जास्त आहे. मागच्या 7 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत, तर दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्याही अडीच हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनही मिळत नसल्याचं चित्र आहे.

कोरोनाच्या या संकटात अनेक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. बहुतेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरिबांना जेवण मिळवणंही मुश्किल झालं आहे. अशाच गरजूंना मदत करण्यासाठी इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांचे वडील मेहमूद खान (Mehmood Khan) धावले आहेत. मेहमूद खान त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मोफत अन्न वाटप करत आहेत.

युसूफ पठाणने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या संकटात मदतीला येण्याची पठाण कुटुंबाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी गरजूंना मदत केली. मागच्या वर्षी इरफान आणि युसूफ यांनी बडोद्याच्या स्थानिक प्रशासनाला 4 हजार मास्क दिले, हे मास्क नंतर नागरिकांना वाटण्यात आले.

पठाण बंधूंनी बडोदो पोलिसांना रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सी व्हिटॅमीनच्या गोळ्याही दिल्या होत्या, यानंतर बडोदा पोलिसांनी त्यांचे आभारही मानले होते.

कोरोनाचा फटका इरफान आणि युसूफ पठाण यांनाही बसला वर्ल्ड रोड सेफ्टी सीरिज खेळण्यासाठी रायपूरला गेलेल्या इरफान आणि युसूफ यांना कोरोनाची लागण झाली, त्याच सीरिजमध्ये खेळलेले सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एस बद्रीनाथ (S. Badrinath) यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इरफान पठाण हा सध्या आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कॉमेंट्री करत आहे.

Published by: Shreyas
First published: April 28, 2021, 5:33 PM IST

ताज्या बातम्या