• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन

क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन

2001 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा देशात आणण्यात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 जुलै : कोरोनाचा प्रसार देशात मोठ्या वेगानं होत आहे. कोरोनामुळं क्रीडा विश्वाला सगळ्यात मोठा झटका बसला आहे. अर्जुन पुरस्कार विजेते आणि दिग्गज पॅरा बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. भारतीय पॅरा बॅडमिंटनचे अध्यक्ष एनसी सुधीर यांनी ही माहिती दिली. सुधीर यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला हे सांगण्यात अतिशय दु:ख होत आहे की, गुरुवारी दुपारी रमेश टिकाराम यांचे निधन झाले". सुधीर यांनी सांगितले की, 51 वर्षीय टिकाराम यांना ताप आणि खोकला होता आणि त्यांना 29 जूनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टिकाराम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा देशात आणण्यात या खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे टिकाराम यांचे मित्र के व्हाय वेंकटेश यांनी सांगितले. तसेच, भारताची सध्याची पॅरा बॅडमिंटन खेळाडू दीपा मलिकनेही ट्वीट करत दु:ख व्यक्त केले. दुसरीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या घरात गेली असून आज एकाच दिवसात तब्बल 35 हजार नवे रुग्ण सापडले.
  Published by:Priyanka Gawde
  First published: