मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शोएब अख्तर म्हणतो, हा पाकिस्तानी बॉलर बुमराहपेक्षा भारी!

शोएब अख्तर म्हणतो, हा पाकिस्तानी बॉलर बुमराहपेक्षा भारी!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs Australia) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने जबरदस्त बॉलिंग केली आहे. पण जसप्रीत बुमराह याच्यापेक्षा मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) चांगला बॉलर होता, असं शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs Australia) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने जबरदस्त बॉलिंग केली आहे. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही बुमराहने टेस्ट सीरिजमध्ये अशीच भेदक बॉलिंग केली होती, ज्यामुळे भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती. पण जसप्रीत बुमराह याच्यापेक्षा मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) चांगला बॉलर होता, असं शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला. मोहम्मद आसिफ बुमराहच नाही तर वसीम अक्रमपेक्षाही मोठा बॉलर असल्याचं मत शोएब अख्तरने मांडलं. शोएब अख्तर स्पोर्ट्स टुडेसोबत बोलत होता.

मोहम्मद आसिफने एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गज बॅट्समनलाही त्रास दिला. आसिफसमोर जगातले दिग्गज बॅट्समनना लोटांगण घालताना मी बघितलं आहे. आशियाई टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एबी डिव्हिलियर्स रडायचाच बाकी होता, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.

'जसप्रीत बुमराह एक चलाख बॉलर आहे, पण माझ्यामते आसिफ जास्त चलाख होता. खेळपट्टीवरचं गवत बघण्याआधी वारा कोणत्या दिशेला वाहतो आहे, हे बघणारा जसप्रीत बुमराह पहिला फास्ट बॉलर आहे. ही कला पहिले पाकिस्तानी बॉलरकडे होती. छोट्या रनअपसोबत बुमराह बॅट्समनला घाबरवतो. टेस्ट क्रिकेटमध्ये लोकं बुमराहच्या फिटनेसवर प्रश्न विचारत होते. मीही त्याला जवळून पाहत होतो. त्याच्याकडे जलद बाऊन्सर आहे,' असं शोएब अख्तर म्हणाला.

स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आसिफ याची कारकीर्द संपुष्टात आली. 10 वर्षांआधी इंग्लंडविरुद्ध स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी आढळल्यामुळे मोहम्मद आसिफ, सलमान बट आणि मोहम्मद आमिर यांच्यावर बंदी घालण्यात आली. आसिफने टेस्टमध्ये 106 विकेट आणि वनडेमध्ये 46 विकेट घेतल्या. सात वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर मोहम्मद आसिफची कारकीर्द संपुष्टात आली. 27व्या वर्षानंतर मोहम्मद आसिफ पुन्हा क्रिकेट खेळला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्याला संधी दिली नाही. मोहम्मद आसिफकडे वसीम अक्रमपेक्षाही चांगला बॉलर होण्याची संधी होती, असं शोएब अख्तर म्हणाला.

First published:
top videos