मुंबई, 1 एप्रिल : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. त्याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कमी वेळेतच चांगलं नाव कमावलं आहे, पण पाकिस्तानच्या कर्णधाराला फक्त 17 वर्षांच्या बॉलरने आऊट केलं आहे. डावखुरा चायनामन बॉलर अकरम फैजल (Akram Faizal) याने बाबरची विकेट घेतल्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. पाकिस्तान टीमने फैजलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येही बोलावलं होतं. या कॅम्पमध्ये फैजलने पाकिस्तानच्या बॅट्समनसमोर बॉलिंग केली होती. फैजल पाकिस्तानकडून अंडर-16 क्रिकेटही खेळला आहे. तसंच तो 2018-19 मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. अंडर-16 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर फैजलला पाकिस्तानच्या अंडर-19 टीममध्येही संधी मिळाली होती. 2020-21 च्या नॅशनल अंडर-19 वनडे कपमध्ये फैजलने 10 मॅच खेळून 27 विकेट घेतल्या, पण त्याची सगळ्यात मोठी विकेट बाबर आझम होती. फैजल अक्रमने आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) विकेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विराटला आऊट करण्याचं माझं स्वप्न आहे, लवकरच ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, असं फैजल म्हणाला आहे. आपण इन्स्टाग्रामवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबतही चर्चा केली, तसंच त्याने मला एक बॅट गिफ्ट म्हणून दिल्याचं फैजल म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







