मुलतान, 12 जून : पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचे (Pakistan vs West Indies) खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण 33 ओव्हरनंतर मॅच थांबवण्यात आली. मुलतानमध्ये धुळीचं वादळ आल्यामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मास्क लावला होता. धुळीचं हे वादळ इतकं जोरदार होतं की मॅचही काही काळ थांबवावी लागली. तीन वनडे मॅचची या सीरिजमध्ये पाकिस्तानने आधीच 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
🇵🇰: 155-5 after 33 overs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 12, 2022
Play stopped due to dust storm 🌪️#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/TTPiSgV9s5
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानने 48 ओव्हरमध्ये 269/9 पर्यंत मजल मारली. वादळामुळे सामना 48 ओव्हरचा करण्यात आला. पाकिस्तानकडून सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शादाब खानने 86 रनची खेळी केली. तर इमाम उल हक 62 रन करून आऊट झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार निकोलस पूरनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. कीमो पॉलला 2, जेडन सिल्स, हेडन वॉल्श आणि अकील हुसैन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.