लाहोर, 22 मार्च : ऑस्ट्रेलियन बॅटर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (Pakistan vs Australia) उत्कृष्ट बॅटिंग करतोय. स्मिथने तीन टेस्टमध्ये तीन अर्धशतकं केली आहेत. रावळपिंडीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने 78 रनची खेळी करत पाकिस्तान दौऱ्याची सुरूवात केली. यानंतर कराची टेस्टमध्ये त्याने 72 रन केले. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच ड्रॉ झाल्या, यानंतर आता लाहोरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये स्मिथ 59 रन करून आऊट झाला. तिन्ही वेळा स्मिथला शतक करता आलं नसलं, तरी त्याने ऑस्ट्रेलियाला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवायला मदत केली. 59 रनच्या खेळीमध्ये तर त्याने एक खास रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं.
स्टीव्ह स्मिथ 150 टेस्ट इनिंगनंतर सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. स्मिथने कुमार संगकारा, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना मागे टाकलं आहे. स्मिथच्या नावावर 150 टेस्ट इनिंगमध्ये 7,993 रन आहेत.
कुमार संगकाराच्या (Kumar Sangakara) नावावर 150 टेस्टमध्ये 7,913 रन होते. स्मिथने संगकाराचा हा विक्रम मोडला आहे. या यादीत आता तिसरं नाव सचिन तेंडुलकरचं आहे. सचिनने 150 इनिंगमध्ये 7,869 सेहवागने 7,694 आणि द्रविडने 7,680 रन केले. स्मिथ 8 हजार रन करण्यापासून फक्त 7 रन लांब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Steven smith