कराची, 12 जानेवारी : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीत दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी खेळण्यात आला. यावेळी थ्रो करत असताना चेंडू पंच आलीम डार यांना लागला. मोहम्मद वसीम ज्यूनियरने थ्रो केल्यानंतर चेंडू आलीम डार यांच्या पायावर जोरात आदळला. तेव्हा पंच आलीम डार यांनी रागाने हातातलं जॅकेट खाली टाकलं. यावेळी पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने आलीम डार यांच्या पायाला थोडा मसाजसुद्धा केला. सामन्याच्या ३६ व्या षटकावेळी ग्लेन फिलिप्सने हारीस रौफच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला शॉट मारला. तेव्हा वसीमने चेंडू थेट नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. तिथे पंच आलीम डार यांच्या पायावर बसला. चेंडू जोरात लागल्याने वेदना झालेल्या आलीम डार यांनी हातातली जर्सी जमीनीवर टाकली. पंच आलीम डार यांना चेंडू लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इतर काही खेळाडू हसत होते. तर गोलंदाज नसीम शाहने डार यांच्या पायाला थोडा मसाज केला. यामुळे वातावरण नॉर्मल झालं.
कराचीत दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने शतक लगावलं. पण पाकिस्तानने न्यूझीलंडला २६१ धावांवर रोखलं. फिरकीपटू मोहम्मद नवाजने ४ गडी बाद केले. न्यूझीलंडची एकवेळ स्थिती १ बाद १८३ अशी भक्कम होती. पण त्यानतंर लागोपाठ विकेट पडल्या.
भारत प्लेइंग इलेव्हन प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानचा डाव ४३ षटकात १८२ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानचा कर्णधार ११४ चेंडूत ७९ धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही.