• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • संजना गणेशननं शेअर केला Honeymoon चा फोटो, बुमराह म्हणतो...

संजना गणेशननं शेअर केला Honeymoon चा फोटो, बुमराह म्हणतो...

जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मागच्या महिन्यात संजना गणेशन (Sanjana Ganesan) सोबत लग्न केलं आहे. संजना गणेशननं हानीमूनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 3 एप्रिल :  जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नानंतर पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तो सध्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमसोबत ट्रेनिंग करत आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध होणार आहे. बुमराहनं मागच्या महिन्यात संजना गणेशन  (Sanjana Ganesan) सोबत लग्न केलं आहे. संजना गणेशननं हानीमूनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. 'आयुष्यभराच्या आठवणी आणि बरंच काही...' असं कॅप्शन संजनानं या फोटोला दिलं आहे. या फोटोवर बुमराहनं मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. 'फोटो काढणारा व्यक्ती खरोखरच चांगला आहे' अशी मजेदार प्रतिक्रिया बुमराहनं दिली आहे. संजनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
    जसप्रीत बुमराहनं लग्नाच्या कारणामुळे भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) मालिकेतून माघार घेतली होती.  संजना लग्नानंतर 10 दिवसांनी कामावर परतली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वनडे आधी स्टार स्पोर्ट्सवर संजनाने शोचं एँकरिंग केलं, यावेळी संजनासोबत व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इरफान पठाणही  होते. संजना स्पोर्ट्स एँकर आहे आणि स्टार स्पोर्ट्सच्या टीमचा भाग आहे. बुमराह आणि संजना यांनी 15 मार्चला गोव्यात लग्न केलं, यानंतर गुरुद्वारामध्ये विधी पार पडले. कोरोनामुळे या लग्न सोहळ्याला दोघांच्या कुटुंबामधली फक्त 20 जण उपस्थित होती. कोण आहे संजना गणेशन? संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. तसंच ती कोलकाता नाईट रायर्डस या आयपीएलच्या टीमसाठीही एँकरिंग करते. संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता. पुण्याच्या सिम्बोयसिस इन्स्टिट्यूटमधून संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती. ( वाचा : क्रिकेटचं पिच तयार करणारा मजूर बनला IPL स्टार, 20 वर्षाच्या खेळाडूची inspiring story ) संजनाने आयपीएलमध्ये केकेआर डायरीज नावाचा कार्यक्रमही केला. 2016 साली ती कोलकात्याच्या टीमशी जोडली गेली आणि नाईट क्लब नावाचा शोदेखील संजनानं केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: