जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / बालासोर अपघातग्रस्तांसाठी सेहवागचा मदतीचा हात, आई-वडील गमावलेल्या मुलांना देणार शिक्षण

बालासोर अपघातग्रस्तांसाठी सेहवागचा मदतीचा हात, आई-वडील गमावलेल्या मुलांना देणार शिक्षण

अपघातग्रस्तांसाठी सेहवागचा मदतीचा हात

अपघातग्रस्तांसाठी सेहवागचा मदतीचा हात

Balasore Train Accident : विरेंद्र सेहवागने रविवारी रात्री एक ट्विट करत बालासोर ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 05 जून : तीन दिवसांपूर्वी ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने देशाला हादरवून सोडले आहे. कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू हावडा सुपरफास्ट आणि मालगाडी यांच्यात शुक्रवारी धडक झाली होती. यामध्ये दोन ट्रेनचे एकूण 17 डबे रुळावरून घसरले होते. या अपघातात 288 जणांचा जीव गेला तर 1 हजार पेक्षा जास्त जण जखमी आहेत. या घटनेनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पीडितांना मदतीची घोषणा केलीय. विरेंद्र सेहवागने रविवारी रात्री एक ट्विट करत बालासोर ट्रेन दुर्घटनेतील पीडितांच्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सेहवागने ट्विट केलं की, ज्या मुलांचे आई-वडील या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेत त्या सर्व मुलांना निशुल्क शिक्षण दिलं जाईल. Train Accident : रेल्वे पुन्हा ट्रॅकवर, तरी जबाबदारी संपलेली नाही; केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनावर सेहवागहने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. रेल्वे अपघाताचा फोटो शेअर करताना सेहवागने म्हटलं की, हा फोटो आपल्याला बराच काळ त्रास देईल. दु:खाच्या या काळात किमान या दुर्घटनेत जीव गमावलेल्यां लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तरी घेऊ शकतो. मी अशा मुलांना सेहवाग स्कूलच्या बोर्डिंगमध्ये मोफत शिक्षण देण्याची ऑफर देत आहे. सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना आणि त्या सर्वांचे आभार ज्यांनी मदतकार्यात पुढाकार घेतला. वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवक ज्यांनी रक्तदान केलं त्यांचेही सेहवागने आभार मानले. विरेंद्र सेहवागच नाही तर उद्योगपती गौतम अदानी यांनीही अशीच घोषणा केली आहे. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी रविवारी ट्विटरवर म्हटलं की, आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च अदानी ग्रुप करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात