जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Wimbledon 2023 : विम्बल्डनचा नवा सम्राट, स्पेनच्या कार्लोस अल्कराजला विम्बल्डनचं विजेतेपद

Wimbledon 2023 : विम्बल्डनचा नवा सम्राट, स्पेनच्या कार्लोस अल्कराजला विम्बल्डनचं विजेतेपद

विम्बल्डनचा नवा सम्राट

विम्बल्डनचा नवा सम्राट

Wimbledon 2023 Winner: अल्काराजने जोकोविचला हरवून विम्बल्डन 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पाच सेटच्या लढतीत अल्काराझने विजय मिळवला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Wimbledon 2023 : विम्बल्डनचा नवा सम्राट जगाला मिळाला असून स्पेनच्या कार्लोस अल्कराजने विम्बल्डनचं विजेतेपद मिळवलं आहे. तब्बल 10 वर्षांनी विम्बल्डनला नवा विजेता मिळाला आहे. पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये कार्लोसने नोवाक जोकोविचवर मात केली. 20 वर्षीय अल्कराजचं हे दुसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. तर जोकोविचची विम्बल्डन विजयाची मालिका खंडित झाली आहे. कार्लोसने फेडरर, नदाल, मरे, जोकोविच यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे. स्पेनच्या कार्लोस अल्कराजने जोकोविचचा पराभव करत विम्बल्डन 2023 चे विजेतेपद पटकावले. पाच सेटच्या लढतीत अल्कराजने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचचा 6-1, 6-7(6), 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. वर्ल्ड नंबर वन आणि वर्ल्ड नंबर टू यांच्यात विम्बल्डन फायनलमध्ये चुरशीची स्पर्धा होती. जोकोविचने पहिल्या सेटची शानदार सुरुवात केली आणि त्याने अल्काराजवर 6-1 अशी मात केली. दुसऱ्या सेटमध्ये अल्काराजनने जोरदार पुनरागमन केले. अल्काराजने दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचचा 7-1 असा पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच खूपच थकलेला दिसत होता आणि अल्काराजने याचा फायदा घेतला. अल्काराजने तिसरा सेट 6-1 असा जिंकण्यात यश मिळविले. मात्र चौथ्या सेटमध्ये जोकोविचने चॅम्पियनसारखे पुनरागमन केले. जोकोविचने चौथा सेट 6-3 ने जिंकला. मात्र, पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये अल्काराजने पुन्हा जोकोविचवर मात करत 6-4 असा विजय मिळवला. अशा प्रकारे अल्काराजने जोकोविचला हरवण्यात यश मिळवले. वाचा - सलग पाचव्या जेतेपदासाठी जोकोविच कोर्टवर, विजेत्याला किती कोटींचे मिळते बक्षीस? अल्काराजने रचला इतिहास अल्काराजने वयाच्या 20 व्या वर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. गतवर्षी अल्काराज यूएस ओपन जिंकण्यात यशस्वी ठरला होता. वयाच्या 20 व्या वर्षी अल्काराज हा दोन प्रमुख विजेतेपदे जिंकणारा पाचवा टेनिसपटू ठरला आहे. यासह अल्काराज हा टेनिस जगताचा मुकुट नसलेला बादशहा जोकोविचला मागे टाकणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. जोकोविचने हे विजेतेपद पटकावले असते तर त्याचे हे 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले असते. पण तो चुकला. अल्काराज सोबत खेळताना पिछाडीवर असताना जोकोविच इतका संतापला की त्याने त्याचे रॅकेट देखील तोडले. मात्र, जोकोविचला हरवून अल्काराजने फेडरर, नदाल आणि जोकोविचनंतर टेनिस जगताला नवा स्टार मिळाल्याचे दाखवून दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात