मुंबई, 25 मार्च : नीतू घंघासने शनिवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत मंगोलियाच्या लुत्साईखान अल्तानसेटसेगचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी ती सहावी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे.
अंतिम फेरीत नीतू सुरुवातीपासूनच वरचढ ठरत होती. पहिली फेरी 5-0 ने जिंकल्यानंतर नीतूने लुत्सेखानला दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरी फेरी नीतूने 3-2 अशी जिंकली. तर तिसऱ्या फेरीत देखील नीतूने चांगले कसब दाखवून विजय मिळवला. नीतू घंघास ही 22 वर्षीय असून तिचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे. नीतूने सेमी फानयलमध्ये कझागिस्तानची बॉक्सर अलुआ बाल्कीबेकोवा हिचा 5-2 असा पराभव केला होता.
भारताच्या महिला बॉक्सर मेरी कोम, लैश्राम सरिता देवी, जेनी आरएल, लेखा केसी आणि निखत जरीन या सर्वांनी यापूर्वी भारतासाठी या स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. यास्पर्धेत सहा वेळा पदक जिंकणारी मेरी कोम ही एकमेव बॉक्सर आहे.
NITU GHANGHAS beat Lutsaikhan Atlantsetseg of Mongolia by 5⃣-0⃣in the FINAL #WorldChampionships #WWCHDelhi #Boxing #WBC2023 #WBC @NituGhanghas333 pic.twitter.com/5kpl6dUFzU
— Doordarshan Sports (@ddsportschannel) March 25, 2023
मेरी कोमने 2002, 2005, 2006, 2008, 2010आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006), लेखा केसी (2006) आणि निखत जरीन (2022) हे विजेतेपद पटकावले आहे. नितू घंघासने यास्पर्धेत भारतासाठी जिंकलेले हे 11 वे सुवर्णपदक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boxing champion, Sports