नेपाळच्या कर्णधाराची विक्रमी कामगिरी, विराट-स्मिथला टाकलं मागे

नेपाळच्या कर्णधाराची विक्रमी कामगिरी, विराट-स्मिथला टाकलं मागे

नेपाळच्या क्रिकेट संघाचा कर्णधार पारस खडकाने 52 चेंडूत 102 धावांची खेळी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : नेपाळच्या क्रिकेट संघाने कमी वेळेत खूप मोठी भरारी घेतली आहे. आयपीएलमध्ये संदीप लामिछानेनं कमाल केली होती. त्यानंतर आता नेपाळचा कर्णधार पारस खडकाचे नाव चर्चेत आहे. शनिवारी खडकाने एक विक्रम नावावर केला. यासह त्यानं विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं. खडकाने टी 20मध्ये नेपाळकडून पहिलं शतक करण्याचा मान पटकावला.

पारस खडकाने फक्त 49 चेंडूत शतक साजरं केलं. आशियाई संघातील कर्णधारानं केलेलं हे चौथं वेगवान शतक आहे. त्याने 52 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. नेपाळने 152 धावांचा पाठलाग करताना 9 गडी आणि 4 षटके राखून विजय मिळवला. पारसने त्याच्या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकार मारले. याआधी धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा कर्णधार पीटर सीलरने स्कॉटलंडविरुद्ध नाबाद 96 धावा केल्या होत्या. टी20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक करणारा पारस हा पहिलाच कर्णधार ठरला आहे.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्ध 90 धावांची खेळी केली होती. याआधी विंडीजच्या ख्रिस गेलनं 88 धावा केल्या होत्या.

गेल्या महिन्यात पारस खडकाने मलेशियाविरुद्ध 86 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना कर्णधाराने केलेल्या सर्वोच्च धावांच्या यादीत विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. त्याने 2017 मध्ये लंकेविरुद्ध 82 धावांची खेळी केली होती. पारसने सर्वात कमी धावांचा पाठलाग करताना त्यानं शतक केलं आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 161 धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलनं नाबाद 103 धावा केल्या होत्या.

खेळता खेळता चिमुकला व्हॅनखाली चिरडला; अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2019 01:34 PM IST

ताज्या बातम्या