मुंबई, 13 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात आज सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने यूपी संघाला हरवून सलग चौथा विजय साजरा केला. यूपीची कर्णधार अॅलिसा हिलीने सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या यूपी संघाच्या फलंदाजांची मुंबईच्या सायका इशाक आणि केरच्या भेदक गोलंदाजी दांडी गुल केली. यात कर्णधार अॅलिसा आणि तेहलियाने यांनी चांगली खेळी केल्याने संघाने 20 षटकांत 5 विकेट्स गमावत मुंबई समोर विजयासाठी 159 धावा केल्या. त्यानंतर 160 धावांचा पाठलाग करताना उतरलेल्या मुंबई संघाची सुरुवात देखील फार चांगली राहिली नाही.
सुरुवातीला दोन विकेट गमावल्यानंतर यास्तिका भाटिया, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सिवर-ब्रंटच्या आक्रमक फलंदाजीमुळे मुंबईचा संघ रूपाने दिलेलं आव्हान पूर्ण करू शकलं. मुंबईने 17.3 षटकात 2 गडी गमावर 164 धावा करून यूपीचा पराभव केला. मुंबई संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 33 चेंडूत 53 धावा केल्या. यास्तिकाने 27 चेंडूत 42 तर सिवरने 31 चेंडूत 45 धावांची खेळी करून मुंबईला महिला प्रीमियर लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवून दिला.