जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI VS SRH : अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

IPL 2023 MI VS SRH : अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

आयपीएल 2023 मधील 25 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैद्राबाद संघाचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 25 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैद्राबाद संघाचा पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने हैद्राबादचा 14 धावांनी पराभव केला असून मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्माने 28, ईशान किशनने 38, कॅमेरून ग्रीनने 64, सूर्यकुमार यादवने 7, तिलक वर्माने 37 आणि टीम डेव्हिडने 16 धावा केल्या. तर हैद्राबादकडून मॅक्रो जॅनसेनने 2 तर भुवनेश्वर आणि नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घालवून 192 धावा केल्या. तर सनरायजर्स हैद्राबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले.

News18लोकमत
News18लोकमत

विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी सनरायजर्स हैद्राबादचा संघ मैदानात उतरला. यावेळी हैद्राबादची फलंदाजीची सुरुवात खराब झाली मागच्या सामन्यात शतक झळकावलेला फलंदाज हॅरी ब्रुक 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर मयांक अग्रवालने 48, राहुल त्रिपाठीने 7, मार्करमने 22, हेनरिक क्लासेनने 36, मॅक्रो जॅनसेनने 13 धावा तर सुंदरने 10 धावा केल्या. परंतु विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करता न आल्याने  हैद्राबादचा 14 धावांनी पराभव झाला. अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमधली पहिली विकेट :

जाहिरात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या मॅचमध्ये त्याची आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली आहे. 20 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमार शॉट मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झाला, कर्णधार रोहित शर्माने ही कॅच घेतली. तब्बल दोन वर्षांनी अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. केकेआर विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अर्जुनचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात