मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीचं ठरलंय! माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा

धोनीचं ठरलंय! माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपनंतर धोनी एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही त्यामुळे तो टीम इंडियात पुनरागमन करणार की निवृत्ती घेणार यावर सातत्याने चर्चा होत आहे.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 07 मार्च : बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचा कार्यकाळ अनेक चढ उतारांनी भरलेला होता. या काळात त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त राहिले. यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, मला याचं समाधान आहे की धोनीनंतर कोहलीकडे कर्णधार पद दिल्यानंतरचा काळ सहज निघून गेला. याशिवाय एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भविष्याबद्दलही महत्वाचं वक्तव्य केलं. एमएसके प्रसाद यांच्याच कार्यकाळात धोनीने एकदिवसीय आणि टी20 संघाचं नेतृत्व सोडलं होतं.

धोनीने 2019 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनल नंतर एकही सामना खेळलेला नाही. त्या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. यानंतर अनेकदा त्याच्या निवृत्तीच्या बातम्या आल्या मात्र धोनीने त्यावर एकदाही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही.

एमएसके प्रसाद यांनी एका मुलाखतीत धोनीच्या भविष्याबद्दल खुलासा केला. ते म्हणला की, धोनी त्याच्या भविष्याबद्दल एकदम ठाम आहे. त्यानं त्याचा निर्णय मला आणि संघ व्यवस्थापनाला सांगितला आहे. मी त्याबद्दल सविस्तर काही सांगू शकत नाही कारण ते कॉन्फिडेन्शियल आहे. जे काही त्याच्या, सिलेक्शन कमिटी आणि संघ व्यवस्थापनामध्ये ठरलं आहे ते सध्या तरी त्यांच्यापुरतंच राहणं चांगलं असंही ते म्हणाले.

हे वाचा : 67 शतक आणि 24 हजारहून जास्त धावा! आता ‘या’ मुंबईकर क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती

धोनी यंदाच्या बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधूनही बाहेर आहे. धोनीने ब्रेक घेतल्याच्या काळात आर्मी ट्रेनिंग घेतलं. त्याशिवाय त्यानं कुटुंबासोबत वेळ घालवला. टीम इंडियात पुनरागमनावरून रवि शास्त्री, नवे निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांनीही त्यांची बाजू मांडली आहे. दोघांनीही धोनी पुनरागमन करेल याबद्दल शंका नसल्याचं म्हटलं. आय़पीएलमधील धोनीच्या कामगिरीवर सर्व अवलंबून असेल.  सध्या धोनी चेन्नईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे.

हे वाचा : रोहितपासून बुमराहपर्यंत मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मिळते इतके सॅलरी

First published:

Tags: Cricket, MS Dhoni