जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket News : एम एस धोनी, युवराज सह पाच भारतीय क्रिकेटपटूंना MCC कडून मिळाला मोठा सन्मान

Cricket News : एम एस धोनी, युवराज सह पाच भारतीय क्रिकेटपटूंना MCC कडून मिळाला मोठा सन्मान

एम एस धोनी, युवराज सह पाच भारतीय क्रिकेटपटूंना MCC कडून मिळाला मोठा सन्मान

एम एस धोनी, युवराज सह पाच भारतीय क्रिकेटपटूंना MCC कडून मिळाला मोठा सन्मान

मेरीलेबोन क्रिकेट क्लब या क्रिकेटच्या प्रशासकीय संस्थेने बुधवारी नवीन आजीवन सदस्यांची घोषणा केली. यात संस्थेने पाच भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 एप्रिल : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मेरीलेबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी या क्रिकेटच्या प्रशासकीय  संस्थेने बुधवारी नवीन आजीवन सदस्यांची घोषणा केली. यात संस्थेने पाच भारतीय क्रिकेटपटूंच्या नावाची घोषणा केली आहे. या नावांमध्ये महेंद्रसिंह धोनी , युवराज सिंह, सुरेश रैना, झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांच्या नावांचा यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या MCC ने 19 नवीन आजीवन सदस्यांची घोषणा केली आहे.  या वर्षीच्या यादीत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.  भारताव्यतिरिक्त इंग्लंडच्या पाच खेळाडूंना देखील  आजीवन सदस्यत्व देण्यात आले असून या यादीत पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.

News18

News18लोकमत
News18लोकमत

MCC कडून आजीव सदस्यत्व मिळणे हा क्रिकेट विश्वातील खेळाडूंसाठी सन्मानाची गोष्ट असते. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली या खेळाडूंना देखील यापूर्वी हा सन्मान प्राप्त झालेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात