Home /News /sport /

लग्नाच्या वाढदिवसाला धोनीने साक्षीला दिलं स्पेशल गिफ्ट! पाहा PHOTO

लग्नाच्या वाढदिवसाला धोनीने साक्षीला दिलं स्पेशल गिफ्ट! पाहा PHOTO

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) यांचा आज म्हणजेच 4 जुलैला लग्नाचा वाढदिवस आहे. हे दोघं त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

    रांची, 4 जुलै : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) यांचा आज म्हणजेच 4 जुलैला लग्नाचा वाढदिवस आहे. हे दोघं त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावरही या दोघांना त्यांचे चाहते शुभेच्छा देत आहेत. धोनी सोशल मीडियावर कमी ऍक्टिव्ह असतो, पण साक्षी मात्र बरीच सक्रीय असते. एमएस धोनीचे अनेक अपडेट आणि फोटो ती सोशल मीडियावर शेयर करत असते. यावेळीही धोनीने लग्नाच्या वाढदिवसाबद्दल दिलेल्या गिफ्टचा फोटो तिने शेयर केला आहे. साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक फोटो शेयर केले आहेत. यामध्ये एका विंटेज कारचा फोटो देखील आहे. धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त साक्षीला ही गाडी दिली आहे. फॉक्सवॅगन बीटल ही विंटेज कार धोनीने पत्नीला दिली आहे. sakshi instagram story लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या या गिफ्टबद्दल धन्यवाद, असं कॅप्शन साक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीला दिलं आहे. 4 जुलै 2010 साली धोनीने साक्षीसोबत लग्न केलं. त्याआधी एक दिवस देहरादूनमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. काही दिवस हे दोघं एकमेकांना डेट करत होते, पण कोणलाही याची कल्पना नव्हती. धोनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा मैदानात दिसेल. आयपीएलच्या दुसऱ्या सत्राचं आयोजन युएईमध्ये होणार आहे. धोनी आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करतो. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 29 मॅचनंतर अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: MS Dhoni, Sakshi dhoni

    पुढील बातम्या