दिल्ली, 13 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेऊन तीन वर्षे झाली. तरी त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. यंदाचे आयपीएल धोनीचे अखेरचे असेल अशी चर्चा होती. त्यामुळे चाहतेसुद्धा आपल्या या लाडक्या खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी गर्दी करत होते. मैदानात धोनी धोनी असा आवाजही घुमत असे. धोनी त्याच्या चाहत्यांची लहानशी मागणीसुद्धा पूर्ण करताना अनेकदा दिसला. आता असाच एका चाहत्यासोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी त्याच्या चाहत्याची इच्छा पूर्ण करताना दिसतोय. धोनीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून यात त्याच्या दोन्ही बाजूला चाहते उभा असल्याचं दिसतं. यात एक चाहता फोटोसाठी धोनीला खास स्टाइलमध्ये पोज देण्यास सांगतो. यावर धोनीही स्मितहास्य करत चाहत्याने सांगितल्याप्रमाणे पोज देतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसारंगा विकेट घेतल्यानंतर ज्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करतो त्याच स्टाइलमध्ये धोनीने ही पोज दिली. WTC फायनलमधून वगळल्याने अश्विनने व्यक्त केली खंत; म्हणाला, मी स्वत:ला सिद्ध….
MS Dhoni is always there for fans.
— Johns. (@CricCrazyJohns) July 12, 2023
What a character. pic.twitter.com/Bh0ByRkjbj
धोनी नुकताच चेन्नईला गेला होता. तिथे धोनीने त्याच्या प्रोडक्शन हाउसच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. धोनीचा एलएमजी चित्रपट लवकरच येणार आहे. या कार्यक्रमावेळी धोनीची पत्नी साक्षीसुद्धा उपस्थित होती. यंदा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं. गतविजेत्या गुजरातला हरवून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली.