टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी (Rai Laxmi) यांच्या अफेयरची बरीच चर्चा झाली होती. याबाबत धोनीने कधीच काही भाष्य केलं नसलं तरी अभिनेत्रीने मात्र याबाबत खुलासा केला होता. आयपीएल 2008 दरम्यान या दोघांची भेट झाली होती. याचवेळी दोघांच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या, पण नंतर दोघांचं ब्रेक-अप झालं.
राय लक्ष्मीने अनेक तेलगू, कन्नड आणि तामीळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीनंतर राय लक्ष्मीने बॉलीवूडमध्येही एण्ट्री घेतली होती.
राय लक्ष्मीने जुली-2 आणि अकिरा या चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच ती दक्षिणेतल्या 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये दिसली.
एमएस धोनी आणि राय लक्ष्मीचं ब्रेक-अप कोणत्या कारणामुळे झालं याबाबत दोघांनी कधीच वाच्यता केली नाही. पण धोनीसोबतचं आपलं नातं खूप मोठी चूक होती, असं राय लक्ष्मी म्हणाली होती.
धोनीसोबतचं माझं नात एक असा डाग आहे, जो मी खूप काळ पुसू शकणार नाही, असं राय लक्ष्मी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाली होती.