जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / MS Dhoni Birthday : धोनीचा अनोखा अंदाज, फॉर्म हाऊसवर खास दोस्तांसोबत कापला केक, VIDEO

MS Dhoni Birthday : धोनीचा अनोखा अंदाज, फॉर्म हाऊसवर खास दोस्तांसोबत कापला केक, VIDEO

धोनीचा अनोखा अंदाज, फॉर्म हाऊसवर खास दोस्तांसोबत कापला केक, VIDEO

धोनीचा अनोखा अंदाज, फॉर्म हाऊसवर खास दोस्तांसोबत कापला केक, VIDEO

धोनीच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांनी वेगवगेळ्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान धोनीने शनिवारी त्याच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै : भारताचा माजी क्रिकेटर एम एस धोनी याने काल त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. धोनीच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांनी वेगवगेळ्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान धोनीने शनिवारी त्याच्या सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. महेंद्रसिंह धोनी हा प्राणी प्रेमी असून त्याच्या रांची येथील फार्म हाऊसवर घोड्यांपासून ते विविध प्रजातीच्या श्वानांपर्यंत अनेक प्राणी आहेत. धोनी अनेकदा त्याच्या पाळीव प्राण्यांची स्वतःहून काळजी घेताना अनेकदा दिसतो. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताइद असणारा धोनी काल 42 वर्षांचा झाला. एकीकडे त्याचे चाहते विविध पद्धतीने त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत असताना धोनीने मात्र त्याच्या लाडक्या श्वानांसह वाढदिवस साजरा केला.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

धोनीने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी फार्म हाऊसवरील श्वानांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसला. धोनीचे चाहते त्याच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात