मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni दुसऱ्यांदा बाबा होणार, साक्षीकडे Good News!

MS Dhoni दुसऱ्यांदा बाबा होणार, साक्षीकडे Good News!

एमएस धोनी (MS Dhoni) आणि साक्षी (Sakshi Dhoni) 2022 मध्ये नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. साक्षी धोनी चार महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं सुरेश रैनाची (Suresh Raina Wife) पत्नी प्रियंका रैनाने (Priyanka Raina) सांगितल्याचं वृत्त आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 16 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL Final 2021) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (CSK vs KKR) पराभव करत चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने आपल्या कुटुंबासोबत मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवादेखील मैदानात आली. धोनीनेही विजयानंतर साक्षी आणि झिवाला मैदानातच मिठी मारली. धोनीचा पत्नी आणि मुलीला मिठी मारतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसंच धोनी दुसऱ्यांदा बाबा बनणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. एमएस धोनी आणि साक्षी 2022 मध्ये नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. साक्षी धोनी चार महिन्यांची प्रेग्नंट असल्याचं सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैनाने सांगितल्याचं वृत्त क्रिकट्रॅकर या वेबसाईटने दिलं आहे. एमएस धोनी किंवा साक्षी धोनी यांच्यापैकी कोणीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एमएस धोनी आणि साक्षी यांची मुलगी झिवाचा जन्म 2015 साली झाला. झिवाच्या जन्मावेळी धोनी 2015 सालचा वनडे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात खेळत होता. मुलीच्या जन्मानंतरही धोनी तिला बघण्यासाठी बरेच दिवस गेला नव्हता. वर्ल्ड कपमधलं टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर धोनी भारतात परतला तेव्हा त्याने आपल्या मुलीची पहिल्यांदा भेट घेतली. चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंसोबत त्यांची पत्नी आणि गर्लफ्रेंडही आयपीएलदरम्यान युएईमध्ये होत्या. सीएसकेच्या प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंची कुटुंब स्टेडियममध्ये दिसायचे. यावेळी साक्षी धोनीच्या कपड्यांवरून ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. केकेआरविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पहिले बॅटिंग करत 3 विकेट गमावून 192 रन केले. फाफ डुप्लेसिसने 59 बॉलमध्ये 86 रनची खेळी केली. फाफने ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीसोबत पार्टनरशीप केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 रनच करता आले. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या दोन्ही ओपनरनी अर्धशतकं करूनही कोलकात्याचा पराभव झाला. शार्दुल ठाकूरने 3 तर जॉश हेजलवूड आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, MS Dhoni, Sakshi dhoni

    पुढील बातम्या