मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ब्रिटीश नागरिकत्व मिळाल्यावर IPL खेळणार का? मोहम्मद आमीरने दिलं उत्तर

ब्रिटीश नागरिकत्व मिळाल्यावर IPL खेळणार का? मोहम्मद आमीरने दिलं उत्तर

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) नजीकच्या भविष्यात आयपीएल (IPL) खेळेल, अशा चर्चा गेले काही दिवस सुरू होत्या. या चर्चांवर आता खुद्द मोहम्मद आमीरने प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद आमीर सध्या ब्रिटीश नागरिकत्व (British Citizenship) मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 मे : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर मोहम्मद आमीर (Mohammad Amir) नजीकच्या भविष्यात आयपीएल (IPL) खेळेल, अशा चर्चा गेले काही दिवस सुरू होत्या. या चर्चांवर आता खुद्द मोहम्मद आमीरने प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद आमीर सध्या ब्रिटीश नागरिकत्व (British Citizenship) मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटनचं नागरिकत्व मिळालं, तर तो आयपीएल खेळू शकतो. याआधी पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अझर महमूद (Azar Mahmood) हादेखील इंग्लंडचं नागरिकत्व मिळाल्यानंतर आयपीएल खेळला, त्यामुळेच मोहम्मद आमीरविषयी या चर्चा सुरू झाल्या.

मोहम्मद आमीर याने मात्र या बातम्या ऐकून आपण हैराण झालो असल्याची प्रतिक्रिया दिली. एका युट्यूब चॅनलसोबत आमीर बोलत होता. माझी पत्नी ब्रिटीश नागरिक आहे, याच कारणामुळे मी ब्रिटनचं नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी मुलंही ब्रिटनमध्येच शिकणार आहेत, असं मोहम्मद आमीर म्हणाला.

'मला कळत नाही, आयपीएल खेळण्याबाबतच्या चर्चा कुठून सुरू होतात. असं होणार नाही, पाकिस्तानशिवाय मी कोणत्याही देशाचं प्रतिनिधीत्व करणार नाही. माझी बायको ब्रिटीश नागरिक आहे, त्यामुळे माझ्याकडे तिथलं कार्ड आहे. याआधीही पाकिस्तानी खेळाडूंकडे युकेचा पासपोर्ट होता, पण माझ्या नावाच्या बाबतीतच एवढा गोंधळ का घातला जात आहे,' असा सवाल मोहम्मद आमीरने विचारला.

'माझी मुलं ब्रिटनमध्ये शिकणार आहेत, पण माझं इथलं कार्ड दोन वर्षांनी संपणार आहे. जेव्हा कार्डची वैधता संपेल तेव्हा पुढच्या गोष्टी होतील, त्यामुळे माझ्याबाबत चुकीच्या बातम्या चालवू नका,' असं आवाहनही मोहम्मद आमीरने केलं.

मोहम्मद आमीरने पाकिस्तानसाठी 36 टेस्ट, 61 वनडे आणि 50 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर पक्षपाती पणाचा आरोप करत आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आमीरने टेस्टमध्ये 119 विकेट, वनडेमध्ये 81 विकेट आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 59 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Cricket, Ipl, Pakistan