जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

Mithali Raj Retirement: मिताली राजने 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करियरनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीने तिच्या करियरमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आणि तोडलेही. तिचा जन्म 1982 साली राजस्थानच्या जोधपूरमध्ये झाला होता. मितालीचे वडील एयरफोर्समध्ये ऑफिसर होते.

01
News18 Lokmat

जगातल्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या मिताली राजने बुधवार 8 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 1999 साली तिने आयर्लंडविरुद्ध पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. यानंतर तिने 2002 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि मग 2006 साली करियरमधली पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. आता 2022 साली म्हणजेच 23 वर्षांच्या करियरनंतर मितालीने या खेळाला निरोप दिला आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

मितालीचा जन्म 1982 साली 3 डिसेंबरला झाला. मितालीचं कुटुंब तेव्हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहत होतं, पण ती तामीळ परिवारातली आहे. मितालीचे वडील दोराई राज भारतीय वायूसेनेमध्ये एयरमन (वॉरंट ऑफिसर) होते आणि आई लीला राज आहे. मितालीचं कुटुंब नंतर जोधपूरहून हैदराबादला राहायला आलं. मितालीने सुरूवातीचं शिक्षणही हैदराबादमध्ये केलं. (Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

मितालीने वयाच्या 10व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली आणि काही काळातच तिची बॅट तळपायला लागली. 16व्या वर्षीच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हाही ती हैदराबादमध्येच राहत होती. हैदराबादच्या कीज हायस्कूलमध्ये तिने शिक्षण घेतलं, यानंतर इंटरमीडिएटच्या शिक्षणासाठी तिने सिकंदराबादच्या कस्तुरबा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये दाखला घेतला. (Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

मिताली राजने तिच्या मोठ्या भावासोबत शाळेत असतानाच क्रिकेट कोचिंगला सुरूवात केली. यानंतर तिला रेल्वेच्या टीममध्ये संधी मिळाली, याशिवाय एयर इंडिया आणि एशिया महिला-XI टीमचंही मितालीने प्रतिनिधीत्व केलं. दोन दशकांपेक्षा जास्तच्या करियरमध्ये मितालीने खूप काही मिळवलं. (AFP)

जाहिरात
05
News18 Lokmat

मिताली राजला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. 2003 साली तिला अर्जुन पुरस्कार, 2015 साली पद्मश्री देण्यात आला. यानंतर मागच्या वर्षी 2021 साली क्रीडा जगतातला सगळ्यात मोठा सन्मान असलेल्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार देऊन मितालीचा गौरव करण्यात आला. (Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

पूर्णिमा राव, अंजुम चोप्रा आणि अंजू जैन यांच्यासारख्या दिग्गज महिला खेळाडूंसोबत खेळलेल्या मिताली राजने आपल्या करियरच्या पहिल्या वनडेमध्ये नाबाद शतक केलं होतं. त्या सामन्यात मितालीने 114 रनची नाबाद खेळी केली. भारतीय महिला टीमने त्या मॅचमध्ये आयर्लंडचा 161 रनने पराभव केला होता. (AFP)

जाहिरात
07
News18 Lokmat

मितालीने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 1997 सालच्या महिला वर्ल्ड कपमध्ये मितालीला भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळालं पण प्लेयिंग इलेव्हनमध्ये मात्र तिला जागा मिळाली नाही. मितालीचं वय तेव्हा फक्त 14 वर्षांचं होतं. 2001 साली लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध तिने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या तिसऱ्याच टेस्टमध्ये मितालीने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावलं आणि करेन रोल्टनचं 209 रनच्या सर्वाधिक टेस्ट स्कोअरचा विक्रमही मोडला. पाकिस्तानच्या किरण बलूचने वेस्ट इंडिजविरुद्ध 242 रन करून हा विक्रम नंतर मोडला. (AFP)

जाहिरात
08
News18 Lokmat

मितालीने 12 टेस्टमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 699 रन केले. याशिवाय वनडे करियरमध्ये तिने 232 मॅचमध्ये 7,805 रन केल्या, यात 7 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये मितालीने 89 सामन्यांमध्ये 17 अर्धशतकांच्या मदतीने 2,364 रन केले. लेग स्पिन बॉलिंग करणाऱ्या मितालीच्या नावावर 8 आंतरराष्ट्रीय विकेटही आहेत. (AFP)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    जगातल्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या मिताली राजने बुधवार 8 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 1999 साली तिने आयर्लंडविरुद्ध पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. यानंतर तिने 2002 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि मग 2006 साली करियरमधली पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. आता 2022 साली म्हणजेच 23 वर्षांच्या करियरनंतर मितालीने या खेळाला निरोप दिला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    मितालीचा जन्म 1982 साली 3 डिसेंबरला झाला. मितालीचं कुटुंब तेव्हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहत होतं, पण ती तामीळ परिवारातली आहे. मितालीचे वडील दोराई राज भारतीय वायूसेनेमध्ये एयरमन (वॉरंट ऑफिसर) होते आणि आई लीला राज आहे. मितालीचं कुटुंब नंतर जोधपूरहून हैदराबादला राहायला आलं. मितालीने सुरूवातीचं शिक्षणही हैदराबादमध्ये केलं. (Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    मितालीने वयाच्या 10व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली आणि काही काळातच तिची बॅट तळपायला लागली. 16व्या वर्षीच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हाही ती हैदराबादमध्येच राहत होती. हैदराबादच्या कीज हायस्कूलमध्ये तिने शिक्षण घेतलं, यानंतर इंटरमीडिएटच्या शिक्षणासाठी तिने सिकंदराबादच्या कस्तुरबा गांधी ज्युनियर कॉलेजमध्ये दाखला घेतला. (Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    मिताली राजने तिच्या मोठ्या भावासोबत शाळेत असतानाच क्रिकेट कोचिंगला सुरूवात केली. यानंतर तिला रेल्वेच्या टीममध्ये संधी मिळाली, याशिवाय एयर इंडिया आणि एशिया महिला-XI टीमचंही मितालीने प्रतिनिधीत्व केलं. दोन दशकांपेक्षा जास्तच्या करियरमध्ये मितालीने खूप काही मिळवलं. (AFP)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    मिताली राजला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. 2003 साली तिला अर्जुन पुरस्कार, 2015 साली पद्मश्री देण्यात आला. यानंतर मागच्या वर्षी 2021 साली क्रीडा जगतातला सगळ्यात मोठा सन्मान असलेल्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार देऊन मितालीचा गौरव करण्यात आला. (Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    पूर्णिमा राव, अंजुम चोप्रा आणि अंजू जैन यांच्यासारख्या दिग्गज महिला खेळाडूंसोबत खेळलेल्या मिताली राजने आपल्या करियरच्या पहिल्या वनडेमध्ये नाबाद शतक केलं होतं. त्या सामन्यात मितालीने 114 रनची नाबाद खेळी केली. भारतीय महिला टीमने त्या मॅचमध्ये आयर्लंडचा 161 रनने पराभव केला होता. (AFP)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Mithali Raj : वायूसेना ऑफिसरची मुलगी, जोधपूर ते टीम इंडिया, असा होता 23 वर्षांचा प्रवास

    मितालीने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 1997 सालच्या महिला वर्ल्ड कपमध्ये मितालीला भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्थान मिळालं पण प्लेयिंग इलेव्हनमध्ये मात्र तिला जागा मिळाली नाही. मितालीचं वय तेव्हा फक्त 14 वर्षांचं होतं. 2001 साली लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध तिने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या तिसऱ्याच टेस्टमध्ये मितालीने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावलं आणि करेन रोल्टनचं 209 रनच्या सर्वाधिक टेस्ट स्कोअरचा विक्रमही मोडला. पाकिस्तानच्या किरण बलूचने वेस्ट इंडिजविरुद्ध 242 रन करून हा विक्रम नंतर मोडला. (AFP)

    MORE
    GALLERIES

  • 08 08