मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /स्टुअर्ट बिनीचं स्पेशल रेकॉर्ड, पत्नी मयंतीचा ट्रोलर्सवर निशाणा

स्टुअर्ट बिनीचं स्पेशल रेकॉर्ड, पत्नी मयंतीचा ट्रोलर्सवर निशाणा

स्टुअर्ट बिनी (Stuart Binny) हा सध्या लिस्ट ए क्रिकेट विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) नागालँडकडून खेळत आहे. यावेळी त्याने स्वत:च्या नावावर शानदार रेकॉर्ड केलं. बिनीच्या या रेकॉर्डवर प्रतिक्रिया देत त्याची पत्नी मयंती लँगरने (Mayanti Langer) ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे

पुढे वाचा ...

मुंबई, 2 मार्च : भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिनी (Stuart Binny) हा सध्या लिस्ट ए क्रिकेट विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) नागालँडकडून खेळत आहे. यावेळी त्याने स्वत:च्या नावावर शानदार रेकॉर्ड केलं. बिनीच्या या रेकॉर्डवर प्रतिक्रिया देत त्याची पत्नी मयंती लँगरने (Mayanti Langer) ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर स्टुअर्ट बिनी आणि मयंती लँगर यांना वारंवार ट्रोल करण्यात येतं, त्यामुळे तिने प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकप्रिय स्पोर्ट्स एँकर मयंती लँगर आणि स्टुअर्ट बिनी यांचं लग्न 8 सप्टेंबर 2012 साली झालं होतं. मागच्या वर्षीच हे दोघं आई-वडील बनले. मयंतीने मागच्या वर्षी मुलाला जन्म दिला. आयपीएल 2019 सालच्या लिलावात स्टुअर्ट बिनीला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही. यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. तेव्हापासून बिनी आयपीएलमध्ये दिसला नाही. पण स्थानिक क्रिटेमध्ये बिनीने 100वी लिस्ट ए मॅच खेळली आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या पाचव्या राऊंडमध्ये नागालँडकडून खेळताना त्याने हे रेकॉर्ड केलं.

नवऱ्याच्या या खास रेकॉर्डबाबत मयंतीने ट्विट केलं. मयंतीने फक्त तिच्या नवऱ्याचं कौतुक केलं नाही, तर ट्रोलर्सनाही सुनावलं. '17 वर्षांमध्ये 100 मॅच, सगळ्या टीकाकारांसाठी आणि प्रामुख्याने पाठिंबा देणाऱ्यांसाठी, आणखी एका यशाबद्दल अभिनंदन चॅम्प,' असं ट्विट मयंतीने केलं.

स्टुअर्ट बिनीने भारतासाठी 6 टेस्ट, 14 वनडे आणि 3 टी-20 खेळल्या. 2014 साली इंग्लंडविरुद्धच्या मॅचमधून स्टुअर्ट बिनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्येही त्याने 95 मॅच खेळल्या आहेत. मुंबई, राजस्थान, बँगलोरच्या टीममध्ये तो होता. 36 वर्षांचा बिनी 17 वर्षांपासून कर्नाटकसाठी खेळत होता, आता तो नागालँडच्या टीममध्ये आहे.

First published:

Tags: Cricket