
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे 2019 मध्येही चालली. फक्त चाललीच नाही तर त्याचा तडाखा विरोधकांना इतका मोठा बसला की यात माजी मुख्यमंत्र्यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शिला दिक्षित यांचा पराभव झाला. भाजपचे मनोज तिवारी यांनी साडेतीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते भूपेंद्र सिंह हुड्डा सोनिपतमधून पराभूत झाले. भाजपचे रमेशचंद्र कौशिक यांनी त्यांचा तब्बल 1 लाख 64 हजार मतांनी पराभव केला.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी हरिद्वारऐवजी नैनितालमधून निवडणूक लढवली. मात्र, चार वेळा खासदार राहिलेल्या हरीश रावत यांना पहिल्यांदा लोकसभा लढवणाऱ्या भाजपच्या अजय भट्ट यांनी तब्बल 3 लाख मतांनी पराभूत केलं.

महाराष्ट्रात दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा दणका बसला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव झाला. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी 40 हजार मतांनी विजय मिळवला.

सोलापूर मतदारसंघातून मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. इथं भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला.

मेघालयातील तुरा लोकसभा मतदारसंघातून नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवारांना पराभवाचा दणका बसला. तेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते.

भोपाळमधून काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांना पराभव पत्करावा लागला. भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकुर साडेतीन लाख मतांनी विजयी झाल्या.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा गया लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. जदयुचे विजय मांझी 1 लाख 52 हजार मतांनी विजयी झाले.




