जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'लिटिल मास्टर'चा निवृत्तीनंतरही विक्रम! साता समुद्रापार गावसकरांच्या नावाने स्टेडियम

'लिटिल मास्टर'चा निवृत्तीनंतरही विक्रम! साता समुद्रापार गावसकरांच्या नावाने स्टेडियम

'लिटिल मास्टर'चा निवृत्तीनंतरही विक्रम! साता समुद्रापार गावसकरांच्या नावाने स्टेडियम

भारतीय क्रिकेट टीमचे 73 वर्षीय महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर असंख्य रेकॉर्ड आहेत. गावसकर टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले 10 हजार रन करणारे क्रिकेटपटू होते, याशिवाय त्यांनी बरेच विक्रम केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : भारतीय क्रिकेट टीमचे 73 वर्षीय महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर असंख्य रेकॉर्ड आहेत. गावसकर टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिले 10 हजार रन करणारे क्रिकेटपटू होते, याशिवाय त्यांनी बरेच विक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नाव आणखी मोठं केलेल्या गावसकरांचा आता इंग्लंडमध्ये खास सन्मान होणार आहे. 23 जुलै म्हणजेच आज लीस्टर क्रिकेटला त्यांचं नाव देण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट स्टेडियमला भारताचं नाव देण्यात येईल. लिस्टर क्रिकेटचं नाव गावसकरांच्या नावाने ठेवण्यासाठीची मोहीम भारतीय मूळ असलेले खासदार कीथ वाझ (Keith Vaz) यांनी सुरू केली. कीथ वाझ यांनी बराच काळ खासदार म्हणून लीस्टरचं प्रतिनिधीत्व केलं. लीस्टर क्रिकेटचं नाव बदलून सुनिल गावसकर स्टेडियम ठेवण्याची मागणीही वाझ यांनी सगळ्यात आधी केली होती. इंग्लंडमध्ये मिळत असलेल्या या खास सन्मानासाठी गावसकर प्रसन्न आहेत. ‘मी खूपच खूश आहे आणि मला स्वत:ला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. लिस्टरमध्ये माझ्या नावाने एका स्टेडियमचं नाव ठेवलं जात आहे. लीस्टर खेळ आवडणाऱ्या समर्थकांचं शहर आहे, खासकरून भारतीय क्रिकेट. हा खरंच मोठा सन्मान आहे,’ असं गावसकर म्हणाले. गावसकरांच्या नावाने एखाद्या देशात स्टेडियमचं नाव ठेवणं ही काही पहिली वेळ नाही. याआधी अमेरिकेच्या कँटकी आणि टांझानियाच्या जांसीबारमध्ये त्यांच्या नावावर स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं आहे. सगळ्यात पहिले 10 हजार क्रिकेट जगतात लिटील मास्टर नावाने लोकप्रिय असलेल्या गावसकरांनी 7 मार्च 1987 साली टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. क्रिकेटच्या सर्वोच्च फॉरमॅटमध्ये 10 हजार रन करणारे ते जगातले पहिले खेळाडू ठरले. यानंतर सचिन तेंडुलकर, रिकी पॉण्टिंग, जॅक कॅलिस आणि ब्रायन लारा यांचासह अनेक दिग्गजांनी हा विक्रम केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात