मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय बुकीला अटक

केपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात सेंट्रल क्राइम ब्रँचने आंतरराष्ट्रीय बुकीला अटक केली आहे. याआधी दोन खेळाडूंसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 10:28 AM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय बुकीला अटक

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी सेंट्रल क्राइम ब्रँचने आंतरराष्ट्रीय बुकी सय्याम याला अटक केली आहे. हरियाणात राहणाऱ्या सय्यामला ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेसाठी लूक आऊट नोटीस पाठवण्यात आली होती. केपीएलमध्ये याआधी दोन क्रिकेटपटूंशिवाय तिघांना अटक केली आहे.

कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या दोन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. यामध्ये बेल्लारीचा कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांचा समावेश आहे. 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं.

सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. इतकंच काय तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 मध्ये होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला मुंबई आणि दिल्ली संघातही घेतलं होतं. तिथंही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. तर काझी याआधी कर्नाटककडून तर सध्या मिझोरामकडून खेळतो.

याआधीही काहींना याप्रकरणात अटक झाली आहे. बेंगळुरू ब्लास्टर्सचे बॅटिंग कोच वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेतलं आहे. भावेश बाफनाने एका खेळाडूला एका षटकात 10 धावा देण्यासाठी आमिष दिलं होतं.पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केलेला निशांत सिंग शेखावत संघातील सदस्य आणि बुकींच्या संपर्कात होता. निशांत विश्वनाथन आणि वीनू प्रसाद यांच्याशी बोलत असे. या मॅच फिक्सिंगमुळे केपीएलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

Loading...

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केपीएल 2009 मध्ये सुरू केली होती. आयपीएलच्या धर्तीवर कर्नाटकमधील खेळाडूंसाठी ही लीग सुरू करण्यात आली होती. केपीएलशिवाय तामिळनाडु प्रीमियर लीगमध्येही मॅच फिक्सिंग स्कँडल समोर आलं आहे.

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...