Home /News /sport /

Velocity vs Trailblazers : किरण नवगिरेचं जलद अर्धशतक, व्हिलॉसिटी पराभवानंतरही फायनलमध्ये!

Velocity vs Trailblazers : किरण नवगिरेचं जलद अर्धशतक, व्हिलॉसिटी पराभवानंतरही फायनलमध्ये!

दीप्ती शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या व्हिलॉसिटीने महिला टी-20 चॅलेंजच्या फायनलमध्ये (Womens T20 Challenge 2022) के प्रवेश केला आहे. ट्रेलब्लेजर्सने दिलेल्या 191 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या व्हिलॉसिटीने (Velocity vs Trailblazers) 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 174 रन केले.

पुढे वाचा ...
    पुणे, 26 मे : दीप्ती शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या व्हिलॉसिटीने महिला टी-20 चॅलेंजच्या फायनलमध्ये (Womens T20 Challenge 2022)  प्रवेश केला आहे. आता 28 मे रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातल्या सुपरनोवाजविरुद्ध व्हिलॉसिटी फायनल खेळणार आहे. ट्रेलब्लेजर्सने दिलेल्या 191 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या व्हिलॉसिटीने (Velocity vs Trailblazers) 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 174 रन केले. व्हिलॉसिटीचा 16 रनने पराभव झाल्यानंतरही त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ट्रेलब्लेजर्सना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना 32 रन किंवा त्यापेक्षा जास्तच्या फरकाने जिंकणं गरजेचं होतं. तर व्हिलॉसिटीला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कमीत कमी 159 रन करणं आवश्यक होतं. व्हिलॉसिटीकडून किरण नवगिरेने स्पर्धेतलं सगळ्यात जलद अर्धशतक केलं. किरणने 25 बॉलमध्ये तिचं अर्धशतक पूर्ण केलं. तिने 34 बॉलमध्ये 69 रनची शानदार खेळी केली. ट्रेलब्लेजर्सकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 2 विकेट मिळवल्या. 191 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या व्हिलॉसिटीची सुरूवात चांगली झाली नाही. टीमचा स्कोअर 36 रन झालेला असताना यास्तिका भाटिया 19 रनवर आऊट झाली. सलमा खातूनने यास्तिकाला बोल्ड केलं. यानंतर ओपनर शेफाली वर्माही 15 बॉलमध्ये 29 रन करून आऊट झाली. राजेश्वरी गायकवाडने शेफालीला एलबीडब्ल्यू केलं. लॉरा वॉलवार्टच्या रुपात व्हिलॉसिटीने त्यांची तिसरी विकेट गमावली. वॉलवाटने 16 बॉलमध्ये 17 रन केले. पूनम यादवच्या बॉलिंगवर ऋचा घोषने तिचा कॅच घेतला. दीप्ती शर्मा 116 स्कोअर असताना आऊट झाली. ओपनर एम मेघनाच्या 73 रन आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या 66 रनमुळे ट्रेलब्लेजर्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 190 रन केल्या. दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 113 रनची पार्टनरशीप झाली. मेघनाने 47 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्स मारल्या तर जेमिमाने 44 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्स मारली. ट्रेलब्लेजर्सच्या या स्कोअरला व्हिलॉसिटीची खराब फिल्डिंगचीही मदत झाली. व्हिलॉसिटीच्या फिल्डरनी सोपे कॅच सोडले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या