मुंबई, 10 एप्रिल : आय़पीएलमध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्जला हैदराबादने ८ विकेटने नमवलं. सनरायजर्स हैदराबादची मालकीन काव्या मारनचा या सामन्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती कॅमेरामनवर नाराज झाल्याचं दिसून आलं. सामन्यावेळचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दिसतं की काव्या मारन कॅमेरामनवर नाराज झालीय. काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. हैदराबादच्या प्रत्येक सामन्यासाठी ती स्टेडियमवर हजर असते. स्टेडियममधील तिचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यावेळीही जेव्हा कॅमेरामनने कॅमेरा काव्याकडे फिरवला तेव्हा तिने हट रे असा इशारा केला. याचा व्हिडीओ आता ट्विटर युजर्स शेअर करत आहेत.
रिंकूचं क्रिकेट वडिलांना आवडायचं नाही, पण भावांनी साथ दिली; कुटुंबाचं नशीब बदललं सनरायजर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी केली. तर पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर १४३ धावा केल्या. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विजय मिळवला. पंजाबची अवस्था एक वेळ ९ बाद ८८ अशी झाली होती. मात्र संपूर्ण संघ बाद करण्यात हैदराबादला अपयश आलं. याच सामन्यात तणावाची स्थिती असताना कॅमेरामनने सनरायजर्सची मालकीन काव्याकडे कॅमेरा वळवला. तेव्हा तिला राग आला.