मुंबई, 10 मार्च : सध्या मुंबईमध्ये महिला प्रीमियर लीगचे रंगतदार सामने खेळवले जात आहेत. अशातच काल मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघात झालेल्या सामन्यात दिल्लीची खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्स हिने हवेत घेतलेल्या कॅचने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. जेमिमाहच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते व्हिडिओ वर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच या सामन्यावर पकड बनवून ठेवली होती. सामना सुरु होताच प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या संपूर्ण संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी 105 धावांवर बाद केलं. त्यानंतर मुंबईच्या संघाने दिल्लीच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवत 8 विकेट राखून 106 धावांच आव्हान पूर्ण केलं. परंतु यादरम्यान जेमिमाहने मुंबईच्या फलंदाजांचा घेतलेला जबरदस्त कॅच सर्वांच्या लक्षात राहिला.
मुंबई संघातून सलामीसाठी मैदानात उतरलेल्या यस्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांनी पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. खेळी केली. परंतु दिल्लीची खेळाडू एलिस कॅप्सीच्या गोलंदाजीवर हेलीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मैदानात असलेल्या जेमिमा रॉड्रीग्जने हवेत उडी मारून हेलीची कॅच पकडली. जेमिमाने हवेत उडी मारून घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

)







