Home /News /sport /

बुमराहने रोमॅन्टिक होत पत्नीला दिल्या शुभेच्छा, नीशमने केलं बेक्कार ट्रोल

बुमराहने रोमॅन्टिक होत पत्नीला दिल्या शुभेच्छा, नीशमने केलं बेक्कार ट्रोल

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सोशल मीडियावर संजनाला (Sanjana Ganesan) तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण न्यूझीलंडचा ऑलराऊंडर आणि बुमराहचा मुंबई इंडियन्समधला (Mumbai Indians) सहकारी जेम्स नीशम (James Neesham) याने मात्र ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याचं नाव घेऊन बुमराहला ट्रोल केलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 मे: भारतीय टीमचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून अचानक माघार घेतली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. जसप्रीत बुमराह लग्न करत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचं नंतर समोर आलं. लग्न होईपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. 15 मार्चला त्याने स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) सात फेरे घेतले. यानंतर दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले. लग्न झाल्यानंतर बुमराह आणि संजना यांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) पुनरागमन केलं. बुमराह मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये होता, तर संजना स्टार स्पोर्ट्सवर आयपीएलचं एँकरिंग करत होती. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे अखेर स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आयपीएल स्थगित झाल्यामुळे खेळाडू त्यांच्या घरी गेले आहेत. यानंतर जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर संजनाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण न्यूझीलंडचा ऑलराऊंडर आणि बुमराहचा मुंबई इंडियन्समधला सहकारी जेम्स नीशम याने मात्र त्याला ट्रोल केलं. बुमराहने संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये संजना बुमराहच्या गालावर किस करत आहे. हा फोटो शेयर करताना जसप्रीत बुमराह म्हणाला, 'माझं मन रोज चोरणाऱ्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू माझी आहेस, आय लव्ह यू,'. या फोटोवर कमेंट करत जेम्स नीशम (James Neesham) म्हणाला, 'मला एक मिनीट वाटलं तू ट्रेन्ट बोल्टबाबत (Trent Boult) बोलत आहेस.' जसप्रीत बुमराहसोबत ट्रेन्ट बोल्टही मुंबई इंडियन्ससोबत खेळतो. मागच्या मोसमात बोल्ट आणि बुमराहच्या जोडीने मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मोसमात मात्र बुमराहला चमकदार कामगिरी करता आली नाही, तर बोल्ट पुन्हा एकदा शानदार फॉर्ममध्ये होता. जेम्स नीशम मागच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सच्या टीममध्ये होता, पण पंजाबने रिलीज केल्यानंतर मुंबईने लिलावात त्याच्यावर बोली लावली. या मोसमात नीशमला फक्त एकच सामना खेळता आला, या सामन्यातही तो पहिल्याच बॉलला आऊट झाला. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्स 7 पैकी 4 सामने जिंकले, तसंच पॉईंट्स टेबलमध्ये ते चौथ्या क्रमांकावर होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Jasprit bumrah, Sanjana ganesan

    पुढील बातम्या