बुमराहला रणजी ट्रॉफीत खेळता येणार पण निवड समितीची अट

बुमराहला रणजी ट्रॉफीत खेळता येणार पण निवड समितीची अट

लंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराह दिसणार आहे पण त्यापूर्वी रणजी ट्रॉफीत एक सामना तो खेळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चार महिन्यांनंतर दुखापतीतून सावरला आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी बुमराह सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत तो खेळणार आहे. गेल्या वर्षी बुमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नव्हता. आता भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी बुमराह रणजी ट्रॉफी खेळणार आहे. मात्र, यामध्ये एका दिवसात तो 12 षटकेच गोलंदाजी करणार आहे.

दुखापतीतून सावरलेला बुमराह पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता. दरम्यानच्या काळात त्याने विंडिजविरुद्धच्या मालिकेवेळी विशाखापट्टणममध्ये भारतीय फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी केली. त्याआधी भारतीय संघात पुनरागमन कऱण्यासाठी रणजी ट्रॉफीत खेळण्यास सांगितलं होतं. आता तो सुरतमध्ये केरळविरुद्ध गुजरातकडून खेळणार आहे.

बुमराहला रणजी ट्रॉफी खेळण्यास त्याच्या फिजिओनी काही समस्या नसल्याचे सांगितलं आहे. निवड समिती प्रमुख एमएस के प्रसाद सुरतला उपस्थित असणार आहे. ते बुमराहचा खेळ पाहणार आहेत. दरम्यान, बुमराहच्या खेळाबाबत निवड समितीने गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. बुमराह खेळेल पण दिवसात फक्त 12 षटकेच गोलंदाजी करेल. त्यापेक्षा अधिक नाही.

भारत पुढच्या वर्षी 21 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कसोटी खेलणार नाही. त्यामुळे या प्रकारात बुमराहच्या तंदुरुस्तीची समस्या सध्या तरी भारतासमोर नाही. मात्र आगामी मालिकेआधी कोणताही सामना नसल्याने त्यानं जास्त गोलंदाजी करू नये म्हणून हा सल्ला देण्यात आला आहे.

First Published: Dec 24, 2019 09:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading