मुंबई, 5 जुलै : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) याने सोमवारी विक्रमाला गवसणी घातली आहे. अंडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार विकेट पूर्ण करत इतिहास घडवला आहे. लँकशायरकडून खेळताना केंटविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम केला. या महिन्याच्या शेवटी अंडरसन त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अंडरसनने केंटच्या हीनो कुन्हची विकेट घेऊन एक हजार विकेटचा टप्पा गाठला. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात अंडरसनने एका इनिंगमध्ये 51व्यांदा 5 विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने सुरुवातीच्या 7 ओव्हरमध्ये फक्त 3 रन देऊन 5 विकेट घेतल्या. अंडरसनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 904 विकेट आहेत. यात टेस्ट क्रिकेटमध्ये 617, वनडेमध्ये 269 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये 18 विकेटचा समावेश आहे.
1️⃣0️⃣0️⃣0️⃣ first-class wickets @jimmy9 👏
— County Championship (@CountyChamp) July 5, 2021
Anderson has taken a 5-fer in 7 overs 🐐
Watch Anderson bowl here 👉 https://t.co/uJK9OLMTgs pic.twitter.com/j2535JaiAP
2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अंडरसन या शतकात प्रथम श्रेणीमध्ये एक हजार विकेट घेणारा फक्त 14 वा खेळाडू आहे. एण्डी कॅडिक, मार्टिन बिकनेल, डेवॉन माल्कम आमि वसीम अक्रम यांच्यानंतर अंडरसन हजार विकेट घेणारा पाचवा फास्ट बॉलर आहे. अंडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळताना 162 मॅचमध्ये 26.67 च्या सरासरीने 617 विकेट घेतल्या. भारताविरुद्ध पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी (India vs England) अंडरसन तयारी करत आहे. 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. यानंतर डिसेंबर महिन्यात ऍशेस (The Ashes) खेळवली जाईल.